बारामती इंदापूर साठी १४३४ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तयार.. उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांची माहिती
विधानसभा निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्त तैनात..
आगामी विधानसभा निवडणुक सुरक्षित व शांततेत पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे…
प्रतिबंधक कारवाईवर भर …
बारामती व इंदापूर तालुक्यात सीआरपीसी १०७ / बीएनएसएस १२६ प्रमाणे ५१२३ जणांवर कारवाई करण्यात आल्या असून त्यातील ४१२३ जणांनी अंतिम बॉण्ड घेतला आहे. सीआरपीसी १०९ / बीएनएसएस १२८ नुसार ९ कारवाया करण्यात आल्या आहेत. सीआरपीसी १९० / बीएनएसएस १२९ नुसार ३४७ काराया करण्यात आल्या असून यात २५८ जणांनी अंतिम बॉण्ड घेतला ओहे. सीआरपीसी १४४ / बीएनएसएस १६३ प्रमाणे २०४ प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. याशिवाय मुंबई पोलिस कायद्यानुसार २८० कारवाया करण्यात आल्या असून त्यात १३२ जणांनी अंतिम बॉण्ड घेतला आहे, महाराष्ट्रपोलिस कायद्यनुसार १८ जणांवर कारवाई करण्यात आल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले.
दारू विक्री, जुगारी अड्ड्यांवर कारवाई…
बारामती व इंदापूर तालुक्यात विधानसभा निवडणूक कालावधीत अवैध दारूची विक्री होऊ नये, यासाठी पोलिसांकड़न खबरदारी घेतली जात आहे. इंदापूर तालुक्यात आचारसंहिता लागल्यापासून आजवर ११० कारवाया करीत १ लाख ६३ हजारांचा मुहदेमाल जप्त करण्यात आला, जुगाराच्या २० केसेस करत ४१ जणांवर गुन्हा दाखल करून १ लाख ६७ हजारांचा मुदेमाल जत करण्यात आला.तर बारामती तालुक्यात दारूबदीच्या १०३ कारवायात ४ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तसेच जुगाराच्या ४ कारवाया केल्याचे माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी सांगितले…
विधानसभा निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचे कायद्याचे उल्लंघन होऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या असून, निवडणूक शांततेत व सुरक्षित पार पाडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे…




