ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

स्नेहसंमेलन की होमगार्डांची थट्टा? – आवाज दाबला, प्रश्न टाळले का?


🔥MK NEWS 36 संपादकीय 

“स्नेहसंमेलन की होमगार्डांची थट्टा?”

परेडचे थकलेले बिल, किडचे पैसे थांबले – होमगार्डांची निराशा शिगेला

बारामती  :
बारामती, इंदापूर, वालचंदनगर, दौंड, शिरूर या तालुक्यातील सर्व समादेशक अधिकारी व त्यांच्या पथकातील होमगार्ड यांना 17 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता ब्रहानपूर, बारामती पोलीस उपविभागीय मुख्यालय येथे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आले होते. “संमेलन” म्हणून सर्व होमगार्ड पूर्ण गणवेशात हजर राहिले; पण शेवटी या संमेलनाने होमगार्डांच्या जखमेवर मीठच चोळले.

होमगार्डांना अपेक्षा होती की,

परेडचे थकलेले बिल कधी मिळणार?

ड्रेस किट चे पैसे का थांबलेत?

सेवेतील अन्याय, अनियमित वेतन यावर चर्चा होणार?

पण प्रत्यक्षात त्यांना ना बोलावलं, ना ऐकून घेतलं. फक्त वरिष्ठांचेच ऐकवले गेले. प्रश्न विचारायचा प्रयत्न केला तर संधीच दिली नाही.

हे स्नेहसंमेलन नव्हतं, तर होमगार्डांची थट्टा होती, अशी भावना अनेकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.

होमगार्ड जे दैनंदिन जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावतात, त्यांच्याकडे शासन, प्रशासन आणि विभाग अशा तिघांचाही दुर्लक्ष आहे. परेडचे बिल महिने झाले तरी दिलेले नाही, किडचे पैसे अजूनही अडलेले आहेत, निलंबन-सेवा समाप्तीवर अन्याय होत असतानाही उत्तर नाही. या सगळ्याचा उघडपणे उल्लेख करायचा होता, पण त्याऐवजी केवळ “वरिष्ठांचे भाषण ऐका आणि टाळ्या वाजवा” इतकाच कार्यक्रम झाला.

एक होमगार्डानेच संताप व्यक्त करत म्हटलं – “आम्हाला बोलावलं होतं स्नेहसंमेलनाला की थट्टा करायला? आमचे प्रश्न सोडवले नाहीत, उलट आवाज दाबला गेला. हा फक्त दिखावा होता!”

यामुळे होमगार्डांमध्ये प्रचंड नाराजी असून, “आमच्या न्यायासाठी पुन्हा लढा द्यावा लागेल का?” असा प्रश्न आता सर्वत्र घुमू लागला आहे.


Translate »
error: Content is protected !!