दौंडच्या खेळाडूंचा बारामतीत पराक्रम – ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिपमध्ये घवघवीत यश..!
🔥 MK NEWS 36
ओम मार्शल आर्ट अँड सोशल सर्विस असोसिएशन, दौंड
बारामती ओपन ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिपमध्ये घवघवीत यश
दौंड (विशेष प्रतिनिधी):
ओम मार्शल आर्ट अँड सोशल सर्विस असोसिएशन, दौंड येथील विद्यार्थ्यांनी बारामती येथे दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या बारामती ओपन ऑल इंडिया कराटे चॅम्पियनशिप मध्ये घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत जिल्ह्यातून तब्बल ४५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेचे बक्षीस वितरण शिहान मीनानाथ भोकरे आणि प्रणय शर्मा यांच्या हस्ते पार पडले. ओम मार्शल आर्ट असोसिएशनच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत अनेक पदके पटकावली.
🏆 प्रथम क्रमांक विजेते:
आयुष कुलकर्णी
विठ्ठल पोटे
राजवीर भोंडवे
🥈 द्वितीय क्रमांक विजेता:
कृष्णा कुंभारे
🥉 तृतीय क्रमांक विजेते:
अनुश्री जाधव
सुरज वाल्मिकी
निहाल वाल्मिकी
वंश कांबळे
या विद्यार्थ्यांच्या यशामागे संस्थेचे मार्गदर्शक श्री. मंगेश चव्हाण तसेच प्रशिक्षक नितीन चव्हाण, सनी वाल्मिकी आणि गौरव गवळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विजेत्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना श्री. संदीप शेलार (चीफ रेल्वे तिकीट निरीक्षक दौंड व नॅशनल रेल्वे मजदूर युनियन सेक्रेटरी दौंड), श्री. हनुमंत वाघ (रेल्वे तिकीट निरीक्षक, दौंड), श्रीमती वर्षा चव्हाण (अध्यक्षा – दौंड योगा अँड स्पोर्ट्स असोसिएशन), तसेच ओम मार्शल आर्ट असोसिएशनचे संस्थापक श्री. महेश चव्हाण व उपाध्यक्ष सुधाकर यरोळ यांनी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले




