ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयशिक्षणसामाजिक

“वाहतूक शाखेचा मोर्चा आता शाळकरी मुलांच्या बस-व्हॅनवर – मोठ्यांना सूट, छोट्यांना दंड!”


🔥MK NEWS 36 संपादकीय

वाहतूक शाखेचा मोर्चा आता स्कूल बस-व्हॅन चालकांकडे :

सर्वसामान्यांवर वसुलीचा विळखा, मोठ्यांना मात्र मोकळीक?

बारामती –
वाहतूक शाखेची कारवाई नेमकी कोणासाठी? सर्वसामान्यांसाठी की मोठ्या लोकांच्या गाड्यांना मोकळं सोडण्यासाठी? हा प्रश्न आता अधिकच तीव्र बनला आहे. काल-परवा पासून वाहतूक शाखेने स्कूल बस व व्हॅन चालकांवर मोर्चा वळवला आहे.

पहाटेपासून शाळकरी मुलांना सुरक्षित पोहोचवणारे, सामान्य कुटुंबातील हे वाहनचालक पोलीस स्टेशनला बोलावले जातात, त्यांचे फोटो काढले जातात, आणि नियमांचं पालन करून पिवळी पट्टी, इन्शुरन्स, परवाना असूनही त्यांना त्रास दिला जातो. उलट सकाळी सव्वा आठ वाजता देशपांडे हायस्कूल जवळ मोठ्या व श्रीमंत लोकांच्या गाड्या रस्त्यावर गाड्यांची प्रचंड गर्दी होते, अपघाताचा धोका वाढतो – पण तिथे मात्र एकाही ट्राफिक पोलीसाची उपस्थिती नसते, ना दंड होतो, ना कारवाई!

वाहतूक शाखेचे कर्मचारी साहेबांनी यांनी स्वतः स्कूल बस चालकांना पोलीस स्टेशनला बोलावलं, अशी माहिती समोर आली आहे. संघटनेच्या अध्यक्षांनाही फोनवरून बोलावण्यात आल्याने चालकांमध्ये संताप आहे. पहाटे ५-५.३० वाजता घरचं जेवण न घेता कामाला लागणाऱ्या, मुलांना सुरक्षित शाळेत पोहोचवणाऱ्या या कष्टकरी लोकांवर कारवाईचा बोजा का? असा सवाल होत आहे.

दरम्यान, शोरूमवाल्यांचं अतिक्रमण, हायवेवर बेकायदा उभ्या होणाऱ्या गाड्या, मोठ्या व्यापाऱ्यांचे गैरकृत्य – याकडे मात्र वाहतूक शाखा जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. कपड्यांच्या शोरूमसमोर रोजच्या रोज होणारा वाहतूक कोंडाळा असो की सकाळी देशपांडे स्कूल जवळ होणारी गर्दी – तिथे मात्र ट्राफिक पोलीस दिसतच नाहीत.

“कुटुंबप्रमुख शिस्तप्रिय असेल तर घर व्यवस्थित चालते. त्याचप्रमाणे वाहतूक शाखेचे प्रमुख जर खरचं शिस्तप्रिय असतील, तर सर्वांसाठी एकच नियम असावा. पण इथे दुहेरी न्याय दिसतो आहे.” अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

आजवर सर्वसामान्यांना लायसन्स, इन्शुरन्स, सीट बेल्ट या नावाखाली गाड्या थांबवून दंड वसूल करणं हीच वाहतूक शाखेची पद्धत होती. आता शाळकरी मुलांच्या वाहनांवरही हीच वसुलीची टांगती तलवार लटकवण्यात आली आहे. त्यामुळे “मोठ्यांना सूट, छोट्यांना दंड” हा दुहेरी न्याय बारामतीकरांना पहिल्यांदाच इतक्या स्पष्टपणे अनुभवायला मिळतो आहे.


Translate »
error: Content is protected !!