ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

पंचनामे बनावट? एका पंचाची सही खोटी, दुसरा रेडवेळी घटनास्थळीच नव्हता?


🔥MK NEWS36 

कटफळ केमिकल फॅक्टरी रेड : घातक रसायनांचा खेळ, बनावट पंचनामे आणि राजकीय दबावाचा संशय?
(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)
कटफळ (बारामती) – कटफळ येथील केमिकल फॅक्टरीवर 16 नोव्हेंबर रोजी झालेल्या एक्साईज रेड प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत असून, ही रेड केवळ कागदोपत्री होती की प्रत्यक्षात गंभीर गैरप्रकार झाकण्याचा प्रयत्न होता, असा गंभीर प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.
या फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोडियम हायड्रॉक्साइड (NaOH) या अत्यंत घातक रसायनाचा वापर होत असल्याचा संशय आहे. हे रसायन मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असून, चुकीच्या प्रमाणात वापर झाल्यास गंभीर इजा किंवा मृत्यूही होऊ शकतो. मात्र असे असतानाही हे केमिकल मोठ्या प्रमाणावर वापरले जात होते का? आणि तेही कोणत्या परवान्याने? हा मुख्य प्रश्न आहे.
💥घातक केमिकल कुठून आले? बिले कुठे आहेत?
सोडियम हायड्रॉक्साइड तसेच सोडियम बायकार्बोनेट यांसारखी रसायने ही फॅक्टरी कुठून खरेदी करत होती?
त्यांची वैध खरेदी बिले, GST पावत्या, परवाने आणि साठवणूक परवानगी अस्तित्वात आहे का?
की ही रसायने बेकायदेशीररित्या बाजारातून उचलली जात होती? याची कोणतीही ठोस माहिती एक्साईज तपासात पुढे आलेली नाही.
🚨कॉटन केमिकल, कॅरोटीन आणि साखर कारखान्यांचा गंभीर दुवा?
विश्वसनीय माहितीनुसार, कॉटन केमिकलमध्ये पाणी मिसळून त्याची तीव्रता कमी होऊ नये म्हणून कॅरोटीनसोबत सोडियम हायड्रॉक्साइडचे मिश्रण करण्यात येत होते का? आणि हे मिश्रण थेट साखर कारखान्यांना पुरवले जात होते.
हा प्रकार केवळ कायद्याचा भंग नाही, तर सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ करणारा आहे. एवढ्या घातक रसायनांचा वापर करून तयार झालेले केमिकल जर अन्नसाखळीशी संबंधित कारखान्यांपर्यंत पोहोचत असेल, तर त्याचे परिणाम भीषण असू शकतात.
🚨एक्साईजचे अक्षम्य दुर्लक्ष – जाणूनबुजून डोळेझाक?
इतका गंभीर प्रकार सुरू असतानाही एक्साईज विभागाने याकडे दुर्लक्ष का केले?
की हे दुर्लक्ष मुद्दाम केले गेले?
अधिकाऱ्यांना फोन करूनही ते “आम्हाला काही माहिती नसल्यासारखंच दाखवत आहेत पंचांची सही खोटी आहे याचा पुरावा देखील आपल्याकडे आहे मग यावर तिथे काय कारवाई करणार याचे उत्तर देण्यासाठी त्यांनी टाळाटाळ करता?” अशा थंड प्रतिक्रियेतच का राहिले?
स्पष्ट पुरावे असूनही कारवाई का थांबली?
💥पंचनाम्यांवर संशय – एक सही बनावट, दुसरा पंच घटनास्थळीच नव्हता?
या रेडमधील सर्वात गंभीर बाब म्हणजे पंचनाम्याची विश्वासार्हता.
– एका पंचाची सही खोटी असल्याचा पुरावा उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे.
– दुसरा पंच 16 नोव्हेंबर रोजी रात्री 12:15 वाजता प्रत्यक्ष रेडवेळी तिथे उपस्थित होता का?
त्याचे लोकेशन तपासले असता तो त्या ठिकाणी नसल्याचे पुरावे समोर येण्याची शक्यता आहे?
जर पंच दुपारी सहीसाठी आले असतील, तर रात्री केलेल्या रेड कंपनीत सील न करता तसेच जाणं हे कायदेशीर वैधता राहते का?
✒️राजकीय दबावाचा संशय – अजित पवारांच्या नावाची चर्चा?
या संपूर्ण प्रकरणात आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे राजकीय हस्तक्षेपाचा संशय.
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडेच उत्पादन शुल्क (एक्साईज) खाते असल्याने, त्यांच्या जवळचा कार्यकर्ता आणि एका नगरसेविकेचा पती या फॅक्टरीशी संबंधित असल्याचा आरोप होत आहे.
या जवळिकीचा फायदा घेऊन अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला का?
✒️रेड “मॅनेज” करण्यात आली का?
हे प्रश्न केवळ आरोप न राहता आता तपासाच्या केंद्रस्थानी येत आहेत.
येणाऱ्या काळात सत्य बाहेर येणार?
या रेडमध्ये एक नाही तर अनेक संशयास्पद बाबी आहेत –
घातक केमिकल्स, बनावट कागदपत्रे, संशयित पंचनामे, एक्साईजचे मौन आणि राजकीय दबाव.
भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की पुन्हा एकदा ✒️🗞️प्रकरण दडपले जाणार?
हे येणारा काळच ठरवेल.
MK NEWS36 वाचत राहा – कारण सत्य कितीही दडपले, तरी बाहेर येतेच.


Translate »
error: Content is protected !!