ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

“खोरवडीत भरधाव KTMचा कहर! समोरून दुचाकीला जोरदार धडक; पिता-पुत्र गंभीर जखमी”


🔥MK NEWS36 

खोरवडीत भरधाव KTMची दुचाकीला धडक; पिता-पुत्र जखमी

दौंड-सिद्धटेक मार्गावरील सटवाई मंदिराजवळ अपघात; दुचाकीचेही नुकसान

दौंड : प्रतिनिधी प्रकाश सोनवणे

दौंड-सिद्धटेक मार्गावरील खोरवडी गावच्या हद्दीत सटवाई मंदिराजवळ भरधाव वेगाने आलेल्या KTM मोटारसायकलने समोरून येणाऱ्या हिरो डिलक्स दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीवरील पिता-पुत्र जखमी झाले असून त्यांच्या वाहनाचेही नुकसान झाले आहे.

याप्रकरणी बाळासाहेब शिवाजी सोनवणे (वय ३७, रा. खोरवडी, ता. दौंड, जि. पुणे) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेब सोनवणे हे त्यांचे वडील शिवाजी सोनवणे यांना सोबत घेऊन हिरो डिलक्स मोटारसायकल क्रमांक MH 42 BG 1883 वरून दौंड येथे कामानिमित्त आले होते. काम आटोपल्यानंतर ते खोरवडी येथील रानात जाण्यासाठी दौंड-सिद्धटेक मार्गाने निघाले होते.

खोरवडी हद्दीतील सटवाई मंदिराजवळ आले असता सिद्धटेक बाजूकडून दौंडच्या दिशेने येणाऱ्या KTM मोटारसायकल क्रमांक MH 12 TE 6010 वरील चालकाने भरधाव वेगाने येत त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

धडकेनंतर बाळासाहेब सोनवणे आणि त्यांचे वडील शिवाजी सोनवणे हे दोघेही रस्त्यावर पडून जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी राकेश सोनवणे यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही जखमींना उपचारासाठी दौंड येथील पिरॅमिड हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

उपचारादरम्यान बाळासाहेब सोनवणे यांच्या उजव्या पायाच्या नडगीला दुखापत झाली असून पंजाला फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच शिवाजी सोनवणे यांच्या चेहऱ्यावर व कपाळावर जखमा झाल्या असून उजवा पाय फ्रॅक्चर झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी KTM मोटारसायकल क्रमांक MH 12 TE 6010 वरील अज्ञात चालकाविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 653/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम 281, 125(a), 125(b), 324(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव वेगाने, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून व निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून पिता-पुत्रांना दुखापत तसेच त्यांच्या दुचाकीचे नुकसान केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार म्हेत्रे (ब. नं. 311) करीत असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार माने (ब. नं. 3283) यांनी केली आहे.


Translate »
error: Content is protected !!