“बारामतीपासून महाराष्ट्रभर बनावट केमिकलची साखळी? अजित पवार प्रभावातील कारखाने केंद्रस्थानी”
🔥MK NEWS36
🔴 बारामतीतील केमिकल रेड प्रकरण : कारवाईतच संशय, नागरिकांच्या जीवाशी खेळ तर नाही ना?
(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)
बारामती :
बारामती शहरात सध्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांचे सत्कार सोहळे मोठ्या उत्साहात पार पडत आहेत. लोकप्रतिनिधींचा गौरव स्वागतार्ह असला, तरी त्याचवेळी त्यांच्या पार्श्वभूमीशी संबंधित काही गंभीर प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होताना दिसत आहेत.
१६ नोव्हेंबर रोजी रात्री साधारण १२.१५ वाजण्याच्या सुमारास बारामतीतील एका केमिकल फॅक्टरीवर राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या छाप्याच्या कारवाईबाबत अनेक विसंगती आणि संशयास्पद बाबी पुढे येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
पंचनामा दुसऱ्या दिवशीच का?
महत्त्वाची बाब म्हणजे, छापा १६ नोव्हेंबरच्या रात्री टाकण्यात आला असताना प्रत्यक्ष पंचनामा मात्र दुसऱ्या दिवशी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे १.१५ वाजता करण्यात आल्याचे समजते. अवघ्या एका तासात म्हणजे २.३० पर्यंत ही संपूर्ण कारवाई आटोपल्याची नोंद आहे.
➡️ इतक्या मोठ्या केमिकल युनिटची तपासणी, नमुने, मोजदाद आणि पंचनामा अवघ्या एका तासात शक्य आहे का?
➡️ रात्री छापा टाकल्यानंतर त्या कंपनीला नियमाप्रमाणे सील करण्यात आले होते का?
असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिसांना FIR दाखल करू दिली नाही?
या प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे, रात्री FIR दाखल करण्यासाठी आलेल्या पोलिसांना तक्रार नोंदवू न देता माघारी पाठवण्यात आल्याची चर्चा आहे.
➡️ जर गुन्हा उघड झाला होता, तर FIR का दाखल झाली नाही?
➡️ ही कारवाई कोणाच्या दबावाखाली झाली का?
असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पंचनाम्यातील सहीवर संशय
या पंचनाम्यात दाखवलेल्या पंचांपैकी एका पंचाची सही चुकीची अथवा डुप्लिकेट असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
➡️ पंचनामाच संशयास्पद असेल, तर संपूर्ण कारवाईच संशयाच्या भोवऱ्यात येत नाही का?
➡️ या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहानिशा केली आहे का?
डुप्लिकेट केमिकल साखर कारखान्यांना?
स्थानिक पातळीवर अशी चर्चा आहे की संबंधित कंपनीतून ७० ते ८० टक्के केमिकल हे साखर कारखान्यांना पुरवले जात होते. विशेष म्हणजे बारामती परिसरातील अनेक साखर कारखाने व महाराष्ट्र मध्ये हे माननीय अजित पवार यांच्या विचारधारेतील मानले जातात — माळेगाव, भवानीनगर, दौंड शुगर आदी कारखान्यांची नावे चर्चेत आहेत.
➡️ जर हे केमिकल डुप्लिकेट किंवा निकृष्ट दर्जाचे असेल, तर तो थेट नागरिकांच्या जीवाशी खेळ नाही का?
➡️ या केमिकलचा वापर साखर उत्पादनात झाला असल्यास त्याची गुणवत्ता आणि आरोग्यावर होणारा परिणाम तपासला गेला आहे का?
राजकीय संबंधांचा संशय?
या केमिकल फॅक्टरीचा संबंध एका निर्वाचित नगरसेविकेच्या पतीशी जोडला जात असल्याची चर्चा आहे. सदर व्यक्ती सध्या राजरोसपणे वावरत असून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे संशय अधिक गडद होत आहे.
➡️ राजकीय वजनामुळे कारवाई सौम्य झाली का?
➡️ आर्थिक देवाण-घेवाण झाली का?
हे प्रश्न उपस्थित होत आहेत.
चौकशीची गरज
या संपूर्ण प्रकरणात कारवाईची वेळ, पंचनामा, FIR, पंचांच्या सह्या आणि केमिकलचा वापर — या सर्व बाबी गंभीर असून याची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
MK NEWS 36 येणाऱ्या काळात या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करून संबंधित कागदपत्रे, नियम व जबाबदार अधिकाऱ्यांची भूमिका उघड करणार आहे.
👉 नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न असल्याने सत्य बाहेर येणे गरजेचे आहे.
वाचत रहा — MK NEWS36.



