ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

जंक्शन हद्दीत बेकायदेशीर धंद्यांचा सुळसुळाट – प्रशासन झोपेत की खिशात?


🔥MK NEWS36 संपादकीय 

📰 जंक्शन हद्दीत बेकायदेशीर धंद्यांचे साम्राज्य – प्रशासन झोपेत की खिशात?

इंदापूर तालुक्यातील जंक्शन पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक ना दोन नव्हे तर डझनभर बेकायदेशीर धंदे राजरोसपणे सुरू आहेत. मटका-जुगार, दारू-ताडी, स्क्रॅपचे काळे बाजार, हप्त्यांची उघड वसुली – हे सगळे प्रकार नागरिकांच्या डोळ्यासमोर चालू असून कायद्याच्या रक्षकांनी डोळेझाक केली आहे का, असा सवाल नागरिक विचारू लागले आहेत.

“बागायत पट्ट्यात शेतकऱ्यांचे कष्टाचे पीक उभे आहे, पण पोलीस हद्दीत मटक्याचे पान उभे राहिले आहे”, अशीच परिस्थिती जंक्शनमध्ये दिसून येते. शेतकऱ्यांच्या भागात जुगार-दारूचे अड्डे, काळा बाजार आणि हप्त्यांची लूट रोजची गोष्ट झाली आहे.

नागरिक संतप्तपणे विचारत आहेत –
👉 या धंद्यांना कोणाचा आशीर्वाद आहे?
👉 पोलीस केवळ हप्त्यांच्या जोरावर गप्प बसलेत का?
👉 जंक्शनपासून काही अंतरावरच कॅबिनेट मंत्र्यांचे गाव असताना, इथे एवढे राजरोस धंदे सुरू कसे?

जंक्शन हद्द मोठी असली तरी, प्रत्येक वाड्या-गावात एक ना एक काळा धंदा सुरू आहे. याचा अर्थ, पोलिसांची पकड नाही की पोलिसच भागीदार आहेत, असा गंभीर प्रश्न उभा राहतो.

नागरिकांच्या तोंडी आता एकच चर्चा – “जंक्शन पोलीस प्रशासन झोपेत आहे की कोणाच्या खिशात?”


Translate »
error: Content is protected !!