ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

मोठ्यांना सूट, छोट्यांना दंड – झिरो पोलीस कोण? नागरिकांचा संताप..!


🔥MK NEWS36 संपादकीय 

झिरो पोलीसांचा ‘हप्तावसुली’ खेळ – गोरगरीब चालकांवर गदा, मोठ्यांना सूट?

बारामती तालुक्यातील खासगी पॅसेंजर गाड्या व ट्रान्सपोर्ट गाड्यांवरून एक नवा वादंग उभा ठाकला आहे. वाहतूक शाखेच्या आशीर्वादाने की कोणाच्या छत्रछायेखाली – हा प्रश्न आज सर्वसामान्य चालक व कामगार विचारत आहेत.

स्थानिक पातळीवर “नियमांचा धाक” दाखवत दर महिन्याला गाड्यांकडून हप्ते गोळा करण्याचा प्रकार सुरू आहे. आशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या काही माध्यमांतून पैसे उकळले जातात, असा आरोप वाहनधारकांनी केला आहे.

या गाड्यांची वसुली करणारा झिरो पोलीस कोण?

गोरगरीब चालकांचे दु:ख – ‘दहा रुपयाची कडकी, पण हप्ता मात्र ठोकाच’

गावागावांतून 20-25 किमी प्रवास करून रोजींदारीसाठी कंपनीत येणाऱ्या सामान्य कामगार व छोट्या पॅसेंजर गाड्यांना नियमांची भीती दाखवून हप्ता उकळला जातो. गोरगरीब चालकांकडे जरासं जास्त कागदपत्रांचा बारीकसा मुद्दा उकरून दंड ठोकला जातो, पण मोठे ट्रान्सपोर्टवाले, प्रभावशाली मालक मात्र सुटतात.

झिरो पोलीस’ कोण?

हा पैसा गोळा करणारा “झिरो पोलीस” कोण आहे?

तो प्रत्यक्ष रस्त्यावर नसतो,

पण घरी बसून वसुलीचा डाव खेळतो,

आणि वर म्हणतो, “मी गोळा करत नाही.”

स्थानिकांनी विचारलेला हा प्रश्न आज लोकांमध्ये संतापाचा वणवा पेटवत आहे.

नागरिकांच्या प्रतिक्रिया..

“मोठ्यांना सूट, लहानांवर दडपशाही – हा कसला कायदा?”

“वाहतूक शाखेतून नियमाचे नाव घेऊन हप्ता गोळा होत असेल, तर याला भ्रष्टाचार नाही तर काय म्हणायचं?”

“पोटाची खळगी भरण्यासाठी गाडी लावतो, त्यावरच हप्ता वसूल करून कुटुंबाचा घास हिरावला जातो.”

मोठेच सुरक्षित, छोटेच धोक्यात..!

खासगी गाड्यांना ‘लेबर शटल’ म्हणून परवानगी देण्यात आली, पण आज तीच परवानगी हप्तावसुलीचे हत्यार झाली आहे. चालकांचा प्रश्न सरळसरळ –
“आम्हाला नियमांचा बडगा दाखवला जातो, मग मोठ्या ट्रान्सपोर्टवाल्यांना सूट का?”

👉 निष्कर्ष:
बारामती तालुक्यातील या प्रकारामुळे प्रश्न थेट प्रशासनाला विचारला जातो –

हा ‘हप्तावसुली’चा व्यवसाय कोणाच्या छत्रछायेखाली सुरू आहे?

नागरिकांना व छोट्या वाहनधारकांना त्रास देणारा झिरो पोलीस कोण आहे?

आणि मोठ्या लोकांना सूट देणारे हात कोणते?


Translate »
error: Content is protected !!