ब्रेकिंग न्यूजमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“माझा देश माझा कुंकू” अभियानांतर्गत आंदोलन..!


🔥MK NEWS 36 

कोमल सोनवणे
प्रतिनिधी
दौंड:
भारत-पाकिस्तान संघांमध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्यावर दौंड शहरात तीव्र विरोध करण्यात आला. “माझा देश, माझा कुंकू” या अभियानांतर्गत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून दौंड शहरातील गांधी चौक येथे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र जमून पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करत सामन्याला तीव्र विरोध दर्शवला.

या आंदोलनावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत मोदी सरकारवर निशाणा साधला. या सामन्याला परवानगी देण्यामागे “गृहमंत्र्यांच्या मुलाच्या पाठराखणीचा डाव” असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दौंड तालुका प्रमुख अनिल तात्या सोनवणे यांनी केला.

ते म्हणाले, “आपला देश पाकिस्तानकडून सतत दहशतवादाचे घाव सोसत असताना अशा देशाशी क्रिकेट खेळणे म्हणजे शहीद जवानांचा अपमान आहे. केंद्र सरकारने देशहिताकडे दुर्लक्ष करून आपल्या स्वार्थासाठी हा निर्णय घेतला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट याला कडाडून विरोध करतो.”

या आंदोलनामध्ये तालुका व शहरातील पदाधिकारी, शिवसैनिक व महिला आघाडी कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. आंदोलनादरम्यान गांधी चौक घोषणांनी दुमदुमून गेला.

👉 मुख्य मुद्दे:

“माझा देश माझा कुंकू” अभियानांतर्गत आंदोलन.

दौंड शहरातील गांधी चौक येथे शिवसैनिकांचा जमाव.

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला तीव्र विरोध.

केंद्र सरकारवर गृहमंत्र्यांच्या मुलाच्या पाठराखणीचा आरोप.

अनिल तात्या सोनवणे यांचे तीव्र भाष्य.


Translate »
error: Content is protected !!