ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

“बारामतीत थरार! नदीत उडी, उसाच्या फडात लपूनही ‘पोक्या’ वाचला नाही; पोलिसांनी धाडसाने ठोकल्या बेड्या!”


🔥MK NEWS36 

बारामती पोलिसांचा ‘फिल्मी स्टाईल’ थरार; नदीत उडी मारून उसाच्या फडात लपलेला सराईत गुन्हेगार जेरबंद!

१५ गुन्ह्यांतील फरार आरोपी ‘पोक्या’ अखेर गजाआड; बारामती शहर पोलिसांची धाडसी कारवाई

बारामती (प्रतिनिधी):

गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस आणि न्यायालयीन यंत्रणेला चकवा देणारा, १५ गंभीर गुन्ह्यांतील नॉन बेलेबल वॉरंटधारक सराईत आरोपी शंकर उर्फ पोक्या प्रकाश आडके (रा. मळद) याला बारामती शहर पोलिसांनी अत्यंत धाडसी कारवाई करून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपीने चक्क करा नदीत उडी मारून उसाच्या फडात लपण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी जिवाची पर्वा न करता पाठलाग करून त्याला अखेर जेरबंद केले.

✒️नेमकी घटना काय?

आरोपी शंकर उर्फ पोक्या हा गेल्या अनेक वर्षांपासून विविध गुन्ह्यांत न्यायालयासमोर हजर न राहता फरार झाला होता. त्याच्याविरुद्ध बारामती शहर, तालुका आणि वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात चोरी, वीज चोरी (MSEB) आणि इतर गंभीर स्वरूपाचे १५ गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी केले होते. तो आपल्या मूळ गावी एका दशविधी कार्यक्रमासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार टापरे यांना मिळाली होती.

🌊नदीत उडी आणि उसाच्या फडातील थरार..!

मिळालेल्या माहितीनुसार, २४ मे रोजी सकाळी ७ च्या सुमारास पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच पोक्याने चित्रपटातील दृश्याप्रमाणे करा नदीच्या उंच भिंतीवरून थेट पात्रात उडी घेतली. पोलीस मागेच आहेत हे पाहून त्याने नदी ओलांडली आणि काठावरील दाट उसाच्या शेतात धाव घेतली. उंच वाढलेला ऊस आणि अरुंद वाटांमुळे शोध घेणे कठीण होते, मात्र पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दीड तास कोम्बिंग ऑपरेशन राबवले. अखेर संशयास्पद हालचाल दिसताच पोलिसांनी वेढा घालून त्याला ताब्यात घेतले.

🗞️या गुन्ह्यांमध्ये होता वॉरंट..!

आरोपीविरुद्ध २०११ पासूनचे जुने आणि नवीन असे एकूण १५ खटले प्रलंबित आहेत. यामध्ये:

वडगाव निंबाळकर: १ गुन्हा (MSEB स्पेशल केस)

बारामती तालुका: ७ गुन्हे

बारामती शहर: ७ गुन्हे

अशा एकूण १५ प्रकरणांत न्यायालयाने त्याच्याविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले होते.

💢महिला पोलिसांची मोलाची भूमिका..

या गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी आणि न्यायालयीन प्रक्रियेतील गुंतागुंतीची कागदपत्रे हाताळण्यासाठी बारामती शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार सगुना आवटे व उमा कोकरे यांनी अत्यंत चिकाटीने पाठपुरावा केला. त्यांच्या या कायदेशीर कौशल्यामुळेच आरोपीला अटक करणे सोपे झाले.

🚨पोलिस प्रशासनाकडून कौतुक..

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात हवालदार टापरे, गिरीश नेवसे, वैभव मदने आणि उदय टापरे यांचा समावेश होता.

“कायद्यापासून कोणीही पळू शकत नाही, मग तो नदीत लपो किंवा शेतात. न्यायालयाने वॉरंट जारी केलेल्या प्रत्येक फरार आरोपीचा शोध घेऊन त्यांच्यावर अशीच धडाकेबाज कारवाई केली जाईल.”

— प्रभारी पोलीस निरीक्षक, बारामती शहर पोलीस स्टेशन.

आरोपीची रवानगी आता येरवडा कारागृहात करण्यात आली असून, बारामती पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.


Translate »
error: Content is protected !!