खडकीत भीषण अपघातानंतर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; आरोपीची कार हस्तगत..!
🔥MK NEWS36
खडकी अपघात प्रकरणात तपासाला वेग; आरोपीनं वापरलेली कार पोलिसांच्या ताब्यात
दौंड प्रतिनिधी
खडकी परिसरातील भीषण अपघातानंतर फरार झालेल्या अज्ञात चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर मोहीम उघडली असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार पोलिसांनी हस्तगत केली आहे. या कारवाईमुळे तपासाला महत्वाची गती मिळाली आहे.
ही फिर्याद सौ. ज्योती दादाजी सावंत (वय 30, रा. तुकाईनगर, खडकी, ता. दौंड) यांनी दौंड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. दि. 08 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता पुणे–सोलापूर महामार्गाच्या सर्विस रोडवर शिंदे अॅक्वा पाणी प्लँटजवळ ही दुर्दैवी घटना घडली. फिर्यादी, त्यांची चुलत सासू रूपाबाई सिताराम सावंत (वय 38) आणि मुलगा संग्राम सावंत (वय 11) पायी जात असताना समोरून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी कार क्र. MH 12 XQ 0201 च्या चालकाने अतिवेगात निष्काळजीपणे गाडी चालवत ठोकर दिली.
अपघातात रूपाबाई सावंत आणि तिचा मुलगा संग्राम गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. अपघातानंतर चालकाने कोणतीही मदत न करता किंवा उपचारासाठी न नेताच घटनास्थळावरून पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत संशयित वाहनाचा शोध घेतला. अखेर संबंधित पांढरी कार पोलिसांनी जप्त केली असून तिची तांत्रिक तपासणी करण्यात येत आहे. आरोपी चालकाचा शोध तीव्रगतीने सुरू असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून मिळाली.
फिर्याद पो.हवा. गायकवाड यांनी नोंदवली असून तपास सफौ मलगुडे करीत आहेत. अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडून निष्काळजी वाहनचालकांविरोधात कडक कारवाईची मागणी होत आहे.




