ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

दारू, गुटखा, लॉज धंदा – हे नक्की कोणाच्या कल्याणासाठी?


🔥MK NEWS 36 संपादकीय 

बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीत बेकायदेशीर धंद्यांचा उच्छाद – पोलीस यंत्रणा डोळेझाक करत आहे का?

बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायद्याला चक्क हरताळ फासला जात आहे. एक ना अनेक असे बेकायदेशीर धंदे राजरोसपणे सुरु असून, यात सर्वांत मोठा धंदा म्हणजे दारू विक्री. देवीच्या मंदिरापासून काहीशा अंतरावरही दारू विक्रीचे अड्डे उघडपणे सुरु आहेत.शिर्सुफळ व पारवडी या भागात किमान 15 पेक्षा जास्त ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

एमआयडीसी परिसरात तर जणू या धंद्याचे साम्राज्यच उभे आहे. यामागे नेमका कोणता “गुटका किंग” आहे आणि तो नेमक्या कोणाच्या आशीर्वादाने एवढ्या मोठ्या प्रमाणात धंदा करतो आहे, असा प्रश्न नागरिकांतून सातत्याने उपस्थित होत आहे.

स्थानिक पोलीस यंत्रणेला या सर्व धंद्यांची माहिती नाही असे मानणे कठीण आहे. मग प्रश्न असा की पोलीस मुद्दामून डोळेझाक करत आहेत का? की कुणाच्या दबावाखाली या गुन्हेगारीला आश्रय दिला जातो आहे?

याचबरोबर, लॉजच्या आडून वेश्या व्यवसाय देखील राजरोसपणे सुरु असल्याच्या चर्चा नागरिकांत आहेत. याबाबत प्रभारी अधिकाऱ्यांना माहिती आहे की नाही, किंवा त्यांच्या “मान्यतेवरच” हे धंदे चालतात का, याबाबत संशय निर्माण झाला आहे.

कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेवरच नागरिकांचा विश्वास ढळू लागला आहे. कायदा सर्वसामान्यांपुरता काटेकोर आणि गुन्हेगारांसाठी मोकळा का ठेवला जातोय, हा प्रश्न बारामतीकरांना सतावत आहे.

👉 या सर्व बेकायदेशीर धंद्यांचा तातडीने बंदोबस्त होईल का, की पोलीस प्रशासन केवळ पाहत राहील, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.


Translate »
error: Content is protected !!