वडिलांचे स्वप्न साकार करण्याचा ध्यास — योगेश नालंदे यांचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम कौतुकास्पद…!
🔥MK NEWS 36
📰 पत्रकार बांधवांचा गौरव — कै. नामदेवराव नालंदे प्रतिष्ठानचा पत्रकार सन्मान सोहळा उत्साहात पार पडला..!
बारामती (प्रतिनिधी) — कै. नामदेवराव नालंदे प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित पत्रकार सन्मान सोहळा २०२५ आज ज्येष्ठ नागरिक संघ, बारामती येथे मोठ्या उत्साहात पार पडला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पत्रकार श्री. योगेशजी नालंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि सहकाऱ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम कै. नामदेवराव नालंदे यांच्या आठव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री. गणेश इंगळे (पोलीस उपायुक्त, पुणे), श्री. गणेश बिरादार (अप्पर पोलीस अधीक्षक), श्री. दीपक नाना वाबळे (क्लस्टर झोन प्रमुख, चंदुकाका सराफ) तसेच श्री. माधव जोशी उपस्थित होते.
या वेळी पत्रकार बांधवांचा व प्रतिष्ठित व्यक्तींचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सर्व मान्यवर पाहुण्यांनी आपल्या भाषणातून कै. नामदेवराव नालंदे यांच्या कार्याची पद्धत, पत्रकारितेतील त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांच्या लेखणीतील ताकद यांचा आवर्जून उल्लेख केला.
पत्रकार वसंत मोरे यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “नामदेवराव नालंदे यांची लेखनशैली अद्वितीय होती. थोडक्या शब्दांत प्रभावी लेखन करण्याची त्यांची कला आजही आम्हा सर्वांना प्रेरणा देते.”
अध्यक्ष श्री. योगेशजी नालंदे यांनी प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, “वडिलांचे अपूर्ण ध्येय पूर्ण करण्यासाठी मी पत्रकारिता क्षेत्रात आलो. समाजहितासाठी व सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी आमचे प्रतिष्ठान विविध उपक्रम राबवत आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नानासाहेब साळवे यांनी उत्तमरित्या केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. मेघराज नालंदे, प्रदीप ढुके, डॉ. प्रशांत नालंदे यांनी मोलाचे योगदान दिले.

MK NEWS 36 मुख्यसंपादक.. प्रदीप गायकवाड यांचा सन्मान चिन्ह देऊन मा. पोलीस उपायुक्त गणेश इंगळे साहेब व पोलीस अप्पर अधीक्षक गणेश बिरादार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले..!
पत्रकार म्हणून सन्मानित झालेल्या प्रदीप गायकवाड यांनी आपला आनंद व्यक्त करताना सांगितले की,
> “या सन्मानामुळे माझ्या कार्याला नवी प्रेरणा मिळाली आहे. पुढे आणखी जबाबदारीने सर्वसमावेशक कार्य करीन. श्री. योगेशजी नालंदे व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.”
हा सोहळा केवळ पत्रकारांचा गौरव नव्हे, तर समाजासमोर सत्य, बांधिलकी आणि जबाबदारीची नवी दिशा दाखवणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला. 💐




