ताज्या घडामोडीमहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

आत्महत्या मुक्त बारामतीसाठी रेजशा खान यांचे प्रेरणादायी आवाहन..!


🔥MK NEWS 36 संपादकीय 

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात आत्महत्या प्रतिबंध दिवस उत्साहात साजरा..!

बारामती  –
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी “जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येबाबत जागरूकता निर्माण करून आयुष्यात येणारे ताणतणाव कसे हाताळावेत याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बारामती येथील डीवायएसपी माननीय डॉ. सुदर्शन राठोड होते. त्यांच्या हस्ते “आत्महत्या मुक्त बारामती” या उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. बारामतीतील आत्महत्यांची वाढती समस्या कमी करण्यासाठी सुमन सायको-डायग्नॉस्टिक अँड माईड हिलींग सेंटर यांच्या सहकार्याने हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना आत्महत्या हा प्रश्न नसून त्यावर उपाय शोधणे, संवाद साधणे आणि योग्य मार्गदर्शन घेणे किती महत्त्वाचे आहे, याची जाणीव करून दिली.

प्रमुख व्याख्याते कु. रेजशा खान

या प्रसंगी प्रमुख व्याख्याते कु. रेजशा खान (संचालिका, सुमन सायको-डायग्नॉस्टिकमाईड हिलींग सेंटर), तसेच डॉ. संताजी शेळके (सर्वेसर्वा, मनशांती) उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी भूषविले. उपप्राचार्य डॉ. गाडेकर सर व मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजयकुमार शिंदे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा, पथनाट्य, पोस्टर सादरीकरण व तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या उपक्रमाला यशस्वी प्रतिसाद दिला.

सामाजिक बांधिलकी जपत सुमन सायको-डायग्नॉस्टिक अँड माईड हिलींग सेंटरच्या संचालिका कु. रेजशा खान यांनी आवाहन केले की – “जर कोणाच्या मनात आत्महत्येचा विचार येत असेल किंवा काही वैयक्तिक समस्या सांगता येत नसतील, तर आमच्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. (8605467649)योग्य सल्ला व मार्गदर्शन घेऊन आपण एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचवू शकतो.”

कार्यक्रमाच्या समारोपावेळी विद्यार्थ्यांनी खालील घोषणा दिल्या :

1. “आत्महत्या नाही – आत्मविश्वास हवा”

2. “आत्महत्या मुक्त बारामती – आमची सामूहिक जबाबदारी”

या संदेशासह सर्वांनी या उपक्रमाचा संकल्पपूर्वक स्वीकार केला.


Translate »
error: Content is protected !!