क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

“बारामतीत वाहतूक शाखेचा कारभार आंधळा की मुद्दाम ‘दिखावा’?”


🔥MK NEWS 36 संपादकीय 

वाहतूक शाखेचा आंधळा कारभार!

सर्वसामान्यांवर धाक – श्रीमंतांना मोकळीक!

बारामती –
वाहतूक शाखा खरोखरच कर्तव्य शून्य आहे का? की फक्त दिखावा कारवाई करून मूळ प्रश्न झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे? हे प्रश्न आता बारामतीकरांच्या मनात जोरदार उमटू लागले आहेत.

सर्वसामान्य नागरिकांच्या गाड्यांवर काळ्या काचा, फिल्म काढणे, फोटो फेसबुकवर टाकणे एवढ्यावरच वाहतूक शाखा समाधानी आहे. मात्र, खरा प्रश्न – रस्त्यांवर फुटपाथ व्यापून उभे असलेले शोरूमचे अतिक्रमण – याकडे मात्र मुद्दामहून दुर्लक्ष केले जात आहे. बारामती दूध संघासमोर पोलीस उभे असतात, पण समोरच असलेल्या शोरूमच्या अतिक्रमणावर एकही शब्द बोलण्याचीही हिम्मत वाहतूक विभागाला होत नाही का?

आता उघडपणे दाखवतो की वाहतूक शाखेचा कारभार “सर्वसामान्यांना वेटीस – श्रीमंतांना सूट” अशा पद्धतीनेच चालतो आहे. कायद्याचा धाक फक्त गोरगरिबांवर दाखवायचा, पण श्रीमंत शोरूमधारक, मोठे व्यापारी आणि त्यांचे बेकायदेशीर धंदे यांच्यावर पोलीस मुकाटपणे गप्प?

बसस्थानकाजवळील पॅसेंजर वाहतूक बंद करण्याचा दोन-तीन दिवसांचा दिखावा केला, पण मोठ्या मंडळींवर कारवाई करायची वेळ आली की लगेच “हप्ते की फुकट” या पद्धतीने गाड्या पुन्हा सुरू! यामुळे स्पष्ट झाले आहे की कायदा सर्वांसाठी समान नसून तो फक्त गरीबांसाठीच कठोर आहे का?

बारामतीत गेल्या पाच-सहा दिवसांपासून नागरिकांनी पुराव्यासकट बातम्या आणि फोटो प्रसिद्ध केले, पण तरीसुद्धा कारवाई शून्य! मग प्रश्न उपस्थित होतो – वाहतूक शाखा हा कारभार कायद्याला धरून चालवते का, की काहींच्या दबावाखाली फक्त दिखावा करते?

सर्वसामान्य नागरिकांचा स्पष्ट आरोप :
“कायद्याचा धाक फक्त आमच्यावरच, श्रीमंतांना हात घालायची हिंमत वाहतूक शाखेकडे नाही!”


Translate »
error: Content is protected !!