कुरकुंभमध्ये महिलेच्या गळ्यातील २.८५ लाखांचे मिनी गंठण जबरीने लंपास!
🔥MK NEWS36
कुरकुंभ येथे महिलेच्या गळ्यातील २ लाख ८५ हजारांचे मिनी गंठण जबरीने लंपास
दौंड : प्रतिनिधी प्रकाश सोनवणे
कुरकुंभ (ता. दौंड) येथे सगुना कंपनीजवळ सर्व्हिस रोडवर दोन अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील तब्बल २ लाख ८५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण जबरीने ओढून लंपास केल्याची घटना १० सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षदा श्रीकांत जाधव (वय ३६, रा. पांढरेवाडी, मुकादमवाडी, ता. दौंड) या १० सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६.२५ वाजता कुरकुंभ येथील सगुना कंपनीजवळील सर्व्हिस रोडवरून जात होत्या. यावेळी दोन अज्ञात इसमांनी संगनमत करून त्यांच्या गळ्यातील २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण, अंदाजे २ लाख ८५ हजार रुपये किमतीचे, जबरदस्तीने ओढण्याचा प्रयत्न केला.
महिलेने प्रतिकार केला असता आरोपींनी त्यांना धक्का देऊन गळ्यातील गंठण जबरदस्तीने ओढून घेतले आणि घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६७२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेतील दोन्ही आरोपी अद्याप अज्ञात असून, त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर उपलब्ध माहितीच्या आधारे पोलिस तपास करीत आहेत.
दाखल अंमलदार : पोहवा भालेराव, ब.नं. २४७२
तपास अंमलदार : पोहवा पठाण, ब.नं. १८३८




