ई-पेपरताज्या घडामोडीमनोरंजनराजकीयसामाजिक

युवकांच्या मनात स्थान मिळवलेला विनोद हिंगमिरे — राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून उमेदवारीच्या चर्चेत अग्रस्थानी!


🔥MK NEWS36 

📰 बारामती — राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यालयात उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) कार्यालयात काल पक्षाध्यक्ष आदरणीय युगेंद्रदादा पवार यांच्या उपस्थितीत नगरपरिषदेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींमध्ये प्रभाग क्रमांक 9 खंडोबा नगर येथून पक्षाचे सोशल मीडिया कार्याध्यक्ष विनोद रामदास हिंगमिरे यांच्या नावावर चर्चेचा जोर पाहायला मिळाला.

विनोद हिंगमिरे हे गरीब घराण्यातील असून त्यांचे वडील ड्रायव्हरचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु सामाजिक जाणीव आणि जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी बारामतीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी जबाबदारीने पार पाडले असून, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत विरोधकांना सोशल फ्रंटवर ठोस उत्तर दिले, अशी त्यांची ओळख कार्यकर्त्यांत आहे.

खंडोबा नगर परिसरात तरुण मतदारांमध्ये हिंगमिरे यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असून, “गरिब घरातून आलेला कार्यकर्ता, पण मोठं मन असलेला माणूस उमेदवार व्हावा” अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

पक्षातर्फे अंतिम उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच विनोद हिंगमिरे यांच्या नावावर चर्चा रंगली असून, “या वेळेस प्रभाग 9 मधून नव्या पिढीचा चेहरा उमेदवार म्हणून पुढे येईल,” अशी शक्यता कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.


Translate »
error: Content is protected !!