माळेगावात महिलांसाठी आर्थिक उन्नतीची माहितीकार्यशाळा; योजनांचा लाभ घ्यावा?
🔥MK NEWS 36
महिलांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधावी – प्रमोद जाधव
माळेगाव (विशेष प्रतिनिधी): माळेगाव येथील शंकर संकुल सभागृहात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या आयोजित कार्यक्रमात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रमोद जाधव यांनी महिलांना उद्बोधक मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःची व कुटुंबाची आर्थिक प्रगती साधण्याचे आवाहन केले.
जाधव म्हणाले की, नव तेजस्विनी महाराष्ट्र रूल वुमेन्स एंटरप्राईजेस डेव्हलपमेंट प्रोजेक्टचा सविस्तर अभ्यास करून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने महिलांच्या बचत गटांना उद्योगधंद्यासाठी नवीन आर्थिक भांडवलाचा पुरवठा केला जातो. या योजनांचा लाभ महिलांनी घेऊन आपली आर्थिक उन्नती सुनिश्चित करावी, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात शासकीय योजनांची माहिती सोप्या पद्धतीने महिलांसमोर मांडली गेली. या संधीचा लाभ घेऊन महिला स्वावलंबी होऊ शकतात, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे आयोजन बारामती तालुका संघर्ष लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापक धनश्री काळे यांनी केले होते. यावेळी पुणे जिल्हा समन्वय अधिकारी अशोक चव्हाण, सहाय्यक समन्वय अधिकारी सतीश भारती, लेखापाल शंतनु कांबळे, उपजीविका सल्लागार निखिलेश काकडे, रयत बँक बारामती शाखाप्रमुख उल्का पवार, जिव्हाळा गाव विकास समितीच्या अध्यक्षा नलिनी भोईटे, ऑल इंडिया जनसेवा संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षा स्वाती येळे, संगिता चावरे, कल्पना जगताप आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात बचत गटाच्या सहयोगिनी, प्रेरक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, ज्यांनी शासकीय योजना व आर्थिक संधींबाबत माहिती घेतली.




