“रुटींगचे फक्त नाव, प्रत्यक्षात ‘पैशांचा खेळ’ – होमगार्ड ड्युटी वाटपात मोठा घोटाळा आहे का?”
🔥MK NEWS 36 संपादकीय
बारामती होमगार्ड विभागात भ्रष्टाचाराचे दलदलीत पाय!
“पैसे दिला तरच बंदोबस्त – नाहीतर वर्षानुवर्षे ड्युटीला ‘ड्राय डे’”
बारामती :
बारामती तालुक्यातील होमगार्ड विभागात भ्रष्टाचाराची पोखरणारी कीड दिवसेंदिवस ठळकपणे समोर येत आहे. “कोणाला ड्युटी लावायची, कोणाला वगळायचे याचे एडिटिंगच करून भ्रष्टाचाराचा बाजार मांडला आहे”, अशा गंभीर आरोपांची मालिका आता उघड झाली आहे.
एडिटिंग चा खेळ नावे खालीवर?
475 होमगार्ड – पण ड्युटी फक्त ठराविकांना!
तालुक्यात साधारण ४७५ होमगार्ड कर्मचारी आहेत. पण, त्यात काही मोजक्या लोकांनाच वारंवार नगरपरिषद व कायदा सुव्यवस्था बंदोबस्त मिळतो, तर शेकडो जण वर्षानुवर्षे थांबून सुकून जातात. एखाद्या होमगार्डला दोन वर्षात एकही ड्युटी नाही, आणि दुसऱ्यांना सलग दोन बंदोबस्त मिळतात, हे कोणत्या “रुटींग”चे उदाहरण? असा प्रश्नचिन्ह कर्मचाऱ्यांतून उभा राहत आहे.

पैसे दिला तरच बंदोबस्त?
“पैसे दिल तर ड्युटी मिळते, नाहीतर घरी बसावे लागते” अशीच आता खात्यातील प्रथा झाली आहे, असा ठाम आरोप होत आहे. ज्या १० जणांना ऑक्टोबरमध्ये बारामती नगरपरिषदेच्या ड्युटीवर लावले, त्यांनाच सप्टेंबर महिन्यात पुन्हा कायदा सुव्यवस्था बंदोबस्त राखून ठेवला गेला. मग रुटींग कुठे? पारदर्शकता कुठे?

परिपत्रक अनुदान 2019
अनुदानचाही हिशेब संशयास्पद?
फक्त ड्युटीच नव्हे, तर शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातही मोठा गोंधळ उघड झाला आहे. प्रत्येक होमगार्डसाठी शासनाने २,५०० रुपये वर्दीसाठी देण्याचा जीआर २०१९ पासून आहे. ४७५ कर्मचाऱ्यांसाठी साधारण ११ लाख ८७ हजार ५०० रुपये शासनाकडून खर्च झाले. पण हे पैसे खऱ्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले का? की मधल्या काळ्या हातांनी त्याचा घोटाळा केला? या संशयाला आता पक्की किनार मिळाली आहे.

परिपत्रक 2019

अनुदान अडीच हजार कशाप्रकारे आहे
यादीत एडिटिंग – नावं व नंबर बदललेले!
कर्मचाऱ्यांच्या ड्युटी यादीतच एडिटिंग करून खेळ केला गेला असल्याचे पुरावे समोर आले आहेत. एकाच नावाला वेगवेगळे नंबर, तर खरी नावे मागे ढकललेली अशी धक्कादायक उदाहरणे समोर आहेत. “सरकारी कामात फाउंड असा चेंज होतो का? की नोटा घेतल्या की यादीत नाव वर येते?” असा प्रश्न कर्मचारी विचारू लागले आहेत.?

यात अधिकाऱ्याचं नाव सगळ्यात खाली असं असतं का? अधिकारीच नाव वरती असतं का खाली?
उघड करणाऱ्यावर कारवाई!
या भ्रष्टाचाराचा आवाज उठवणाऱ्यालाच खोटे आरोप लावून निलंबित केले गेले. “गुन्हा करणारा सुखरूप, आणि उघड करणारा शिक्षा भोगतो” अशी परिस्थिती निर्माण झाल्याने होमगार्ड विभागाची विश्वासार्हता पूर्णपणे डागाळली आहे.
खात्याची बदनामी की जाणीवपूर्वक बदनामी?
“खात्यात एवढा भ्रष्टाचार चालू असताना त्याची बदनामी होणार नाही तर काय?” असा सवालच जनतेतून उपस्थित होत आहे. प्रत्यक्षात खात्याची बदनामी हे स्वतःच्याच भ्रष्टाचाराने होते, याची जाणीव वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे का?
👉 थोडक्यात:
बारामती होमगार्ड विभाग म्हणजे आता “भ्रष्टाचाराचा बालेकिल्ला”. पैसे दिल तरच ड्युटी, नाहीतर वर्षानुवर्षे वाट बघत रहा. शासनाचे कोट्यवधी रुपये कुठे जातात याचा हिशेब अस्पष्ट. आणि आवाज उठवणाऱ्याला निलंबनाची शिक्षा.




