“कायद्याच्या पानांवर शिक्षा, पण जमिनीवर हप्त्यांचीच मिरवणूक”
MK NEWS 36/ संपादकीय
घरगुती गॅस बेकायदेशीर रिफिलिंग ‘राजरोस’ धंदा — कायदे कागदावर, कारवाई कुठे?
BARAMATI : गेल्या काही दिवसापासून सलग बातम्या झळकूनही बारामती परिसरात घरगुती गॅसचे बेकायदेशीर रिफिलिंगचा व्यवसाय बिनदिक्कत सुरू आहे. कमीत कमी बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या लोकांकडे १०० ते २०० रिकाम्या टाक्यांचा साठा यांच्याकडे असण्याची शक्यता असून, त्या कुठल्यातरी गुप्त गोडाऊनमध्ये लपवून ठेवलेल्या असण्याचा अंदाज आहे. एवढी मोठी यंत्रणा कोणाच्या तरी ‘आशीर्वादाशिवाय’ चालू शकते का, यांच्याकडे या टाक्या येतात कुठून वया टाक्या एवढ्या मोठ्या प्रमाणात कुणाच्या नावावर आहे हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे कारण कोणाच्या गॅस एजन्सीच्या आशीर्वादाशिवाय टाक्या मिळू शकत नाहीसा हा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे….

या धंद्याचे ग्राहक म्हणून स्वीट होम हॉटेलसह काही ठराविक व्यावसायिकांची नावे चर्चेत आहेत. नागरिकांच्या मते, भ्रष्ट प्रशासन, पोलीस, अन्न व नागरी पुरवठा विभाग, तसेच अन्नभेसळ शाखा यांच्या ‘हप्त्यां’मुळेच हा धंदा अक्षरशः फुलत आहे.
कायद्याचे चौकट
या प्रकारावर कारवाई करण्यासाठी कायदा स्पष्ट आहे —
Essential Commodities Act, 1955 ,
Liquefied Petroleum Gas (Regulation of Supply and Distribution) Order, 2000 , नुसार
Explosives Act, 1884 व Explosive Substances Act, 1908 ॲक्टनुसार,IPC कलम 285 ,
Prevention of Black Marketing and Maintenance of Supplies of Essential Commodities Act, 1980 , या कलमांतर्गत गुन्हे दाखल करता येतात..
पण होईल का नाही यात शंकाच शंका आहे..!
कारवाईसाठी जबाबदार विभाग
स्थानिक ,उपविभागीय ,पोलीस ठाणे — गुन्हा नोंदणी व छापे.
जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्न, नागरी पुरवठा विभाग — साठा जप्त करणे, परवाना रद्द करणे.
गॅस कंपनीचे अधिकृत निरीक्षक — सिलेंडर जप्ती व तक्रार नोंदणी.
उपविभागीय अधिकारी (SDO) — धोकादायक ठिकाणे सील करणे.
महसूल विभाग — गोडाऊन जप्त करणे.
नागरिकांनो, तुमचा आवाज महत्वाचा आहे!
तरी नागरिकांना आव्हान आहे — जिथे कुठे, कुणालाही या बेकायदेशीर धंद्याची माहिती असेल, तिथे त्वरित खालील नंबरवर फोन करून प्रशासनाला तक्रार करा.
हे नंबर आम्ही मुद्दाम प्रसिद्ध करत आहोत कारण पोलीस, पुरवठा विभाग आणि प्रशासन या गोष्टीकडे बहुतेक वेळा कानाडोळा करतात. पण ऑनलाईन तक्रार गेल्यानंतर या प्रकरणाचा लेखी पुरावा तयार होतो आणि पाठपुरावा टाळता येत नाही. भ्रष्ट प्रशासनाला जाग येण्यासाठी ही तुमची थेट संधी आहे!
📞 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग हेल्पलाईन : 1800-22-4950 (टोल-फ्री)
🌐 ऑनलाइन तक्रार नोंदणी : https://consumerhelpline.gov.in
📞 पोलीस आपत्कालीन क्रमांक : 112
📞 HP Gas : 1800-2333-555
📞 Bharat Gas : 1800-22-4344
📞 Indane : 1800-2333-555
नागरिकांचा थेट सवाल — “आता तरी हा धंदा बंद होणार की हप्तेच सुरू राहणार?”




