ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

राष्ट्रीय महाकाल सेनेची मागणी : धार्मिक स्थळांसाठी स्थायी सुरक्षा समिती स्थापन व्हावी..!


🔥MK NEWS 36

गिरनार पर्वतावरील घटनेचा निषेध — धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय महाकाल सेनेचे पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन

पुणे (दि. ७ ऑक्टोबर २०२५) :
गुजरात राज्यातील गिरनार पर्वतावर घडलेल्या गंभीर घटनेचा तीव्र निषेध करत धार्मिक स्थळांवरील सुरक्षाव्यवस्था मजबूत करण्याची मागणी राष्ट्रीय महाकाल सेनेच्या पुणे जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी पुणे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

५ ऑक्टोबर रोजी गिरनार पर्वतावर घडलेली घटना देशातील धार्मिक सौहार्द आणि सामाजिक सलोख्याला धक्का देणारी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून, संविधानाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन झाल्याचेही सेनेच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.

निवेदनात राष्ट्रीय महाकाल सेनेने पुढील पाच प्रमुख मागण्या मांडल्या —
1️⃣ घटनेची तात्काळ आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
2️⃣ दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.
3️⃣ धार्मिक स्थळांवरील सुरक्षा वाढविण्यात यावी.
4️⃣ अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून स्थायी सुरक्षा समिती स्थापन करण्यात यावी.
5️⃣ चौकशीचा अधिकृत अहवाल सार्वजनिक करून पारदर्शकता राखण्यात यावी.

ही निवेदन मोहीम संस्थापक पूजनीय श्री श्री १००८ दिगंबर खुशाल भारती जी महाराज यांच्या प्रेरणेने,
राष्ट्रीय अध्यक्ष पूजनीय महंत योगी रोहतास नाथजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली,
तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. दीपकभाई सपके यांच्या आदेशावरून राबविण्यात आली.

या उपक्रमात महाराष्ट्र प्रदेश प्रचारक प्रमुख श्री. अमित लक्ष्मण बगाडे यांनी समन्वयाची भूमिका बजावली.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन जिल्हाध्यक्ष गुरुवर्य प्रकाशभाऊ शिंदे यांनी सादर केले.
त्यांच्यासोबत राष्ट्रीय उपमहामंत्री रोहनजी माने आणि जिल्ह्यातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या निवेदनाद्वारे राष्ट्रीय महाकाल सेनेने देशातील सर्व धार्मिक स्थळांचे रक्षण, सामाजिक ऐक्य आणि धर्मस्वातंत्र्याच्या तत्त्वांचे पालन यासाठी आपली बांधिलकी अधोरेखित केली.


Translate »
error: Content is protected !!