ई-पेपरताज्या घडामोडीमनोरंजनराजकीयसामाजिक

“तळागाळातील कार्यकर्त्यांशी नाळ कायम; प्रकाश सोनवणे यांची जिल्हाध्यक्षपदी दमदार एंट्री”


🔥MK NEWS36 

संघटनात्मक निष्ठेची दखल; प्रकाश विष्णू सोनवणे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

दौंड |विशेष प्रतिनिधी सचिन आटोळे

काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सातत्याने सक्रिय राहून तळागाळातील कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवणारे तसेच सामाजिक प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडणारे प्रकाश विष्णू सोनवणे यांची पुणे जिल्हा उत्तर काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती (एस.सी.) विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या संघटनात्मक कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर पुणे जिल्ह्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे.

 

🎉सन २०२२ ते २०२६ या कालावधीत काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रिय योगदान देताना सोनवणे यांनी दौंड तालुक्यात पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क, विविध सामाजिक प्रश्नांवर आवाज उठविणे, पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार व समन्वय तसेच सोपविण्यात आलेल्या संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्याचे काम त्यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या स्तरावर विधानसभा मतदारसंघाशी संबंधित पत्रव्यवहार आणि संघटनात्मक कामकाजातही त्यांनी सहभाग घेतला. दौंड तालुक्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सामान्य कार्यकर्ते, युवक, महिला तसेच विविध समाजघटकांशी संवाद साधत त्यांनी संघटनात्मक पातळीवर काम केले.

💢दौंडच्या कार्यातून जिल्ह्याच्या जबाबदारीकडे

दौंड तालुक्यातील त्यांच्या कार्याची दखल घेत आता पुणे जिल्हा उत्तर काँग्रेस कमिटीच्या एस.सी. विभागाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नवीन जबाबदारीत जिल्ह्यातील अनुसूचित जाती विभागातील कार्यकर्त्यांना संघटित करणे, तळागाळातील प्रश्न संघटनेच्या माध्यमातून पुढे आणणे, युवकांना संघटनेशी जोडणे तसेच सामाजिक न्याय, समानता आणि संविधानिक मूल्यांच्या आधारे संघटनात्मक काम अधिक व्यापक करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

“ही जबाबदारी माझ्यासाठी केवळ पद नसून कार्यकर्त्यांनी आणि पक्षाने दाखविलेला विश्वास आहे. दौंड तालुक्यात ज्या निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केले, त्याच भावनेने संपूर्ण पुणे जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे,” अशी प्रतिक्रिया प्रकाश विष्णू सोनवणे यांनी व्यक्त केली.

त्यांच्या निवडीमुळे दौंड तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरातून सोनवणे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

👍“जबाबदारी मोठी, संकल्प त्याहून मोठा!”

दौंडच्या मातीतून सुरू झालेला प्रकाश विष्णू सोनवणे यांचा संघटनात्मक प्रवास आता पुणे जिल्ह्याच्या व्यापक जबाबदारीपर्यंत पोहोचला आहे. नव्या जबाबदारीतून सामाजिक न्याय, संघटनात्मक एकजूट आणि संविधानिक मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून प्रभावी संघटन उभारण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.


Translate »
error: Content is protected !!