“गेंड्याच्या कातडीचे अधिकारी – भ्रष्टाचारावर कसलाच आळा नाही का?”
🔥MK NEWS 36 संपादकीय
होमगार्ड विभाग – गेंड्याच्या कातडीचा भ्रष्टाचार आहे का?!
होमगार्ड विभागाला आता गेंड्याच्या कातडीचे म्हणावे लागेल का? कारण कितीही गंभीर बातम्या प्रसिद्ध झाल्या, कितीही भ्रष्टाचार उघडकीस आला तरी या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर किंचितही लाज, भीती किंवा कायद्याचा धाक दिसत नाही.
बारामतीमध्ये एक होमगार्ड भरती होऊन पोलिस सेवेत कार्यरत आहे. प्रत्यक्षात रायगडला ड्युटीवर असतानाही, त्याचे नाव माळेगाव नवरात्राच्या बंदोबस्तात घुसडले गेले. म्हणजेच, ज्या जवानाने पोलीस दलात प्रवेश केला आहे, त्याच्या नावावर होमगार्ड ड्युटी दाखवून बिलं काढण्याचा भ्रष्ट डाव रचला गेला आहे का?
यामागचा सूर काय? तर स्पष्ट आहे — समादेशक, केंद्र नाईक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या संगनमताशिवाय हे होऊच शकत नाही. ऑनलाइन एक यादी दाखवायची आणि ऑफलाइन दुसरी राबवायची, हाच गोरखधंदा या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चालतो.
जवानांमध्ये स्पष्ट चर्चा आहे की, “यादीत आमच्या नावांचा वापर करून पैसा कुणाच्या खिशात जातो?” हा प्रश्न आता टोकाला पोहोचला आहे.
अशाच पद्धतीने सागर नावाच्या होमगार्डचा भ्रष्टाचारातला वापर दिसून येतो. गणपती उत्सव, कायदा-सुव्यवस्था बंदोबस्त, अशा एक ना अनेक ड्युटी — असा सलग बंदोबस्त त्यालाच मिळतोय. होमगार्ड जवानांचा ठाम आरोप आहे की, “चिरमेलीशिवाय अशी सलग ड्युटी मिळणं अशक्य आहे.”
म्हणजेच, बंदोबस्ताच्या याद्यांचा खेळ हा पारदर्शक नियमावलीवर नव्हे तर खिशात किती घातलं यावर चालतोय.
आजवर उघडकीस आलेल्या एक ना अनेक भानगडींमधून हे स्पष्ट झालंय की, होमगार्ड विभागातला हा भ्रष्टाचार शंभर टक्के संगनमतानेच राबवला जातो. आणि सगळ्याच बाबतीत नियम-शर्तींची उघडपणे धज्जी उडवली जाते.




