ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

पाटस टोललचा भोंगळ कारभार, रावणगाव च्या बायपास वर साचले पावसाचे पाणी..!


🔥MK NEWS 36

सचिन आटोळे
दौंड तालुका प्रतिनिधी
दौंड, रावणगाव (ता.दौड) येथील बायपास पुण्याकडे जातांना त्यावर पाणी साचल्याने अपघातच निमंत्रण मिळत आहे. याकडे टोल प्रशासनाने दुर्लक्ष केले असून गेले कित्येक वर्षे पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याचे ढवाचे ढव साचत आहेत. या ठिकाणी टोल प्रशासनाची दिवसातून दोन-तीन चक्र होत आहेत

मात्र त्यांनाही काळजी दिसत नाही याची आजवर न उलगडले हे कोडे आहे. टोल प्रशासितो दत्तक गावातील काही सामाजिक कार्यकर्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करून पाठवलं.  पाटस च्या काही किलोमीटर अंतरावर संपूर्ण बायपास उकरून तो नव्याने त्याची उंची वाढवण्याचे काम चालू आहे परंतु काय गावांमध्ये हे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. बायपासची राहिलेली अर्धवट कामे महामार्ग पडलेले खड्डे ते बुजवण्याची काम यांची सुरू असून टोल मात्र भरगोस वसूल करण्यात येतो सुविधा मात्र शून्य अशी अवस्था या महामार्गावर झाली आहे याबाबत मोठे आंदोलन उभे करण्याची गरज असून येत्या काही काळात ते पण होऊ शकते असा इशारा पण येतील स्थानिक ग्रामस्थानी दिला आहे. अर्धवट राहिलेली बायपासची कामे का केली जात नाहीत याचा पण जाब टोल प्रशाला येथील नागरिक विचारणार आहेत


Translate »
error: Content is protected !!