ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

गेल्या अनेक वर्षांचा कचऱ्याचा प्रश्न शेवटी सुटला..!


🔥MK NEWS 36

दौंड शहरातील प्रभाग 6 मधील कचऱ्याचे साम्राज्य दौंड नगरपालिकेने उशिरा का होईना हटवले..

कोमल सोनवणे,
दौंड प्रतिनिधी │ दि. 22/08/2025

दौंड शहरातील भीमनगर प्रभाग क्र. 6 मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक कचऱ्याच्या समस्येमुळे त्रस्त होते. रस्त्यांवर साचलेल्या घाणीमुळे दुर्गंधी, आजारांचा धोका तसेच राहणीमानावर मोठा परिणाम होत होता. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही तो प्रश्न मार्गी लागत नव्हता.

मात्र काँग्रेसचे नेते मा. प्रकाश सोनवणे यांनी सातत्याने नगरपरिषदेच्या दार ठोठावत आरोग्य विभाग प्रमुख शाहू पाटील यांच्याशी संवाद साधला. प्रभागातील नागरिकांना होत असलेल्या यातना प्रत्यक्ष नगरपरिषदेसमोर मांडल्या. सततच्या चर्चेनंतर अखेर प्रशासनाने तातडीने पावले उचलली.

नगरपरिषदेच्या वतीने जेसीबी व ट्रॅक्टरची मदत घेऊन जमा झालेला कचरा हटवण्यात आला. या कारवाईनंतर प्रभाग क्रमांक 6 मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. अनेक वर्षांनी झालेल्या या समस्येच्या निवारणामुळे स्थानिकांनी नगरपरिषद तसेच मा. प्रकाश सोनवणे यांचे विशेष आभार मानले.

नागरिकांचे म्हणणे आहे की, “गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही या समस्येतून जात होतो. आज अखेर कचरा हटवला गेला आणि परिसर स्वच्छ झाला. हा आनंद आमच्यासाठी सुटकेचा श्वास आहे.”

यामुळे नगरपरिषद आणि जनप्रतिनिधी यांच्यातील संवादातून प्रश्न सुटू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.


Translate »
error: Content is protected !!