महिला सक्षमीकरणासाठी वर्ध्यात राज्यस्तरीय प्रबोधन संमेलनाचे आयोजन..!
🔥MK NEWS36
राज्यस्तरीय प्रबोधन संमेलन : महिला सक्षमीकरण आणि मूलनिवासी नायकांच्या विचारांचा सखोल विचारविनिमय
वर्धा, दि. २ नोव्हेंबर २०२५ (वार्ता प्रतिनिधी):
भारतीय कर्मचारी संघ व भारतीय स्वाभिमानी संघ प्रायोजित भारतीय स्वाभिमानी महिला संघ तर्फे राष्ट्रसंत संत नामदेव महाराज जयंती, गुरुनानक जयंती आणि जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय प्रबोधन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन रविवार, दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता मातोश्री मंगल कार्यालय, आर्वी रोड, वर्धा येथे होणार आहे.
या संमेलनाचे उद्घाटन मा. कुसुमताई मेघवाल (जेष्ठ साहित्यिक, विचारवंत व समाजसेविका, राजस्थान) यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख मार्गदर्शन मा. संगीताताई शिंदे (प्रदेशाध्यक्ष, भारतीय स्वाभिमानी महिला संघ, महाराष्ट्र) यांचे लाभणार आहे.
प्रमुख उपस्थितीत एड. आशा चव्हाण (महासचिव संघटन, भारतीय स्वाभिमानी संघ, महाराष्ट्र) आणि मा. रंजना मेश्राम (CEC सदस्य, BSS, नवी दिल्ली) या मान्यवरांचा सहभाग राहणार आहे. तर संमेलनाचे अध्यक्षस्थान मा. कुंदाताई तोडकर (राष्ट्रीय अध्यक्षा, भारतीय स्वाभिमानी महिला संघ, नवी दिल्ली) भूषविणार आहेत.
या संमेलनात महिलांच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक उन्नतीवर केंद्रित विविध ज्वलंत विषयांवर चर्चा होणार आहे.
प्रमुख विषयांमध्ये —
1️⃣ मूलनिवासी महानायक व महानायिकांचा महिलांविषयीचा दृष्टिकोण — एक गंभीर चर्चा.
2️⃣ बहुजन समाजाच्या आंदोलनांमध्ये महिलांची गरज — एक चिंतन.
3️⃣ महिला सक्षमीकरणासाठी शासनाच्या योजना व “लाडकी बहिण योजना”चा वास्तव परिणाम — एक विश्लेषण.
4️⃣ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि महिलांच्या प्रगतीचे मोजमाप — एक चिंतन.
5️⃣ महिला सुरक्षा कायदा आणि समाजातील (वकिलांच्या) भूमिकेवर चर्चा.
सदर प्रबोधन संमेलनातून महिलांच्या स्वातंत्र्य, हक्क आणि सामाजिक न्याय याविषयी सखोल विचारमंथन होणार असून, राज्यभरातील महिला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे.
प्रसिद्धी प्रमुख:
मा. रुचिरा कानिंदे
सोशल मिडिया प्रभारी, भारतीय स्वाभिमानी महिला संघ, महाराष्ट्र.




