ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

बोरावके नगरात महिलेला लक्ष्य करून मोटरसायकलस्वार चोरट्याची दहशत – नागरिक संतप्त!


🔥MK NEWS 36 

🏍️ दौंडमध्ये पुन्हा एकदा सोन्याची चेन चोरण्याची घटना – नागरिकांत भीतीचे वातावरण!
एसआरपी कॅम्पच्या उपस्थितीतही महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह 🚨

दौंड (प्रतिनिधी) – शहरातील वाढत्या गुन्हेगारी प्रकारांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दौंड येथील बोरावके नगर, भोईटेनगर, नवीन डांबरी रोडवर दि. 19 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता लहान नातवाला घेऊन जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन अज्ञात इसमाने मोटारसायकलवरून येऊन हिसकावून नेली.

घटना घडली तेव्हा परिसरात नागरिकांची काही प्रमाणात वर्दळ होती. महिलेच्या आरडाओरडीनंतर स्थानिक नागरिकांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत चोरटा पसार झाला. विशेष म्हणजे, या ठिकाणापासून काही अंतरावरच एसआरपी कॅम्प असून तेथे २४ तास पोलीस बंदोबस्त असतो. तरीदेखील अशा घटनेने नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नागरिकांचा प्रश्न असा की, “जेव्हा प्रत्येक गेटवर पोलीस कर्मचारी तैनात आहेत, तरी सोन्याची चैन हिसकवली कसे काय होते?”
गुन्हा नोंदवूनही तपासाची गती मंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी वाढली आहे. “जर एसआरपी कॅम्पजवळही महिलांच्या गळ्यातील चैन सुरक्षित नाही, तर मग सामान्य नागरिकांनी सोनं घालावं का?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे तपास जलदगतीने करून आरोपींना अटक करण्याची आणि परिसरात गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी या घटनेची नोंद घेत तपास सुरू केल्याचे सांगितले असले तरी अद्याप आरोपींचा ठावठिकाणा लागलेला नाही.

दौंड परिसरात वाढत असलेल्या अशा चेन स्नॅचिंगच्या घटनांनी नागरिकांची झोप उडाली असून “सुरक्षा कुठे आहे?” हा प्रश्न आता सर्वांच्या ओठांवर आला आहे.

 


Translate »
error: Content is protected !!