“बारामतीत अपघातांची मालिका थांबेना — झगडे पंपाजवळ VERNA गाडीचा ताबा सुटला, बाईकस्वार जखमी!”
🔥MK NEWS36
📰 बारामतीत पुन्हा अपघाताचा थरार! झगडे पंपाजवळ ब्लॅक Verna ने टू-व्हीलरला उडवले 🚗💥
बारामती, दि. ३१ ऑक्टोबर :
बारामती शहरात अपघातांची मालिका थांबता थांबेना! आज झगडे पंपाच्या रोडलगत मोठा अपघात घडला. ब्लॅक रंगाची Verna (MH-01 DB-0883) ही गाडी अनियंत्रित वेगात आली आणि समोरून येणाऱ्या टू-व्हीलर चालकाला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, नागरिकांनी तत्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, गाडी एवढ्या वेगात होती की क्षणात रस्त्यावरील सर्वांनी जीव मुठीत घेतला. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिकांनी संताप व्यक्त करत म्हटले —
“हायवा वाल्यांनी त्रास दिला, आता फोर व्हीलरवाल्यांनी जीव घेणं सुरू केलंय! आम्ही टू-व्हीलर चालवावी की नाही, हाच प्रश्न आता नागरिकांना पडतोय.”
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अपघातातील गाडी नशेत चालवली होती का? याचा तपास सुरू आहे. सध्या जखमीची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
बारामतीमध्ये गेल्या काही दिवसांत सलग घडणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ट्रॅफिक नियंत्रण, वेगमर्यादा आणि नशेत वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.




