ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

मान्यवरांच्या उपस्थितीत बोरीबेलमध्ये गणेश आरती व स्वागत सोहळा पार पडला..!


🔥MK NEWS 36 

बोरीबेल गावात गणेश मूर्ती प्रतिष्ठापना: मान्यवरांच्या उपस्थितीत आगमन व आरती कार्यक्रम संपन्न

बोरीबेल प्रतिनिधी

बोरीबेल (ता. दौंड) येथे गणेश चतुर्थीनिमित्त गावातील विविध मंडळांतर्फे गणेश मूर्ती प्रतिष्ठापना उत्साहात पार पडली. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत गणेशाचे आगमन, पूजन व आरतीचा कार्यक्रम संपन्न झाला.

सुरुवात बोरीबेल रेल्वे स्टेशन गणपती मंडळापासून झाली. त्यानंतर गावडे वस्ती मित्र मंडळाचा गणपती, तसेच सूर्यवंशी वस्ती गणपती मित्र मंडळातर्फे देखील गणेश मूर्तीचे स्वागत व आरती करण्यात आली.

या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य त्रिदल संघटनेचे अध्यक्ष संदीपभाऊ लगड, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर नानाभाऊ खोमणे, प्रमुख मान्यवर डी. के. खळदकर, विशाल जगताप, अक्का ताई लोंढे, तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी गावातील मान्यवर व नागरिकांनी मान्यवरांचे व सहकाऱ्यांचे जोरदार स्वागत केले. स्वागतानंतर गावातील वर्षानुवर्षे रखडलेली कामे व विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. यासंदर्भात मान्यवरांनी गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच, गणरायाच्या चरणी गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली.

कार्यक्रमात गावडे वस्ती येथे संजयभाऊ आटोळे, नवनाथ गावडे, सुनील गावडे, पप्पू गावडे, आंबे गावडे व सर्व सहकाऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर अवचर वस्ती येथेही ग्रामस्थांनी मान्यवरांचे उत्साहपूर्ण स्वागत केले.

कार्यक्रमाचे वातावरण भक्तीमय आणि उत्साहपूर्ण झाले होते. गणेशभक्तांनी एकत्र येऊन गावाच्या विकासासाठी सहकार्याची ग्वाही दिली. शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांनी गणरायाकडे गावाच्या प्रगतीसाठी शक्ती व बुद्धीची प्रार्थना करून येणारा काळ अधिक चांगला जावो अशी अपेक्षा व्यक्त केली.


Translate »
error: Content is protected !!