“सजावट चमकली, पण पावसात वाहून गेली”
🔥MK NEWS 36 संपादकीय
🌧️ बारामतीत पावसाचं दमदार आगमन – विकासाच्या आरशात प्रश्नचिन्ह
बारामती :
बारामती शहरात दमदार पावसाचं आगमन झालं असून या पावसामुळे शहरातील विकासकामांचा चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे. बारामती आज महाराष्ट्रभर नावलौकिक विकासाला आली असली, तरी शहरातील मूलभूत सुविधा आणि नियोजनाच्या कमतरतेमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

🚧 रस्त्यांची बिकट अवस्था
शहरातील अनेक रस्ते अरुंद असून, एका बाजूने गाडी आली की लगेच वाहतूक कोंडी निर्माण होते. पूर्वनियोजनाअभावी झालेले रस्ते आता अपुरे व चुकीच्या पद्धतीने झालेले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पावसामुळे रस्त्यावर साचलेले पाणी वाहतुकीस अडथळा ठरत असून अपघाताची शक्यता वाढली आहे.

💡 बत्ती गुल – अंडरग्राऊंडचा प्रश्न
पावसाळ्यात लाईट जाणं ही बारामतीकरांसाठी नवी गोष्ट राहिली नाही. ‘अंडरग्राऊंड’ केबल टाकल्याचं मोठं काम झालं असलं तरी त्याचा नागरिकांना प्रत्यक्षात फायदा झालेला नाही. पाऊस सुरू झाला की वीजपुरवठा खंडित होतोच, याचा खरा उपयोग काय झाला हा मोठा प्रश्न लोकांसमोर उभा आहे.
🏙️ सजावट विरुद्ध वास्तव
सध्या बारामतीत विविध भागांमध्ये सजावट, सौंदर्यीकरणाचे काम जोमात सुरू आहे. मात्र, या सजावटीला पावसाने धक्का दिला आहे. दमदार पावसामुळे नुकत्याच बसवलेल्या सजावटींची अवस्था खराब होताना नागरिक पाहत आहेत. त्यामुळे “सजावटीवर खर्च करण्यापेक्षा पायाभूत सुविधा सुधारल्या असत्या तर शहर खरं प्रगत झालं असतं” अशी भावना बारामतीकरांमध्ये व्यक्त होत आहे.
📌 नागरिकांचा सवाल
शहरात दमदार विकास झाल्याचा गाजावाजा केला जात असला तरी, पावसामुळे उघड होणाऱ्या समस्या हेच सांगत आहेत की नियोजनात मोठी उणीव आहे. आता नागरिकांचा एकच सवाल – “विकास म्हणजे फक्त सजावट की नागरिकांच्या खऱ्या सोयीसाठी कामं?”



