ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

जंक्शन पोलीस स्टेशनच्या सावलीत वेश्याव्यवसाय, मटका, चक्री – प्रशासन मूकदर्शक?


🔥MK NEWS36 

जंक्शन पोलीस स्टेशनच्या हद्दीतच बेकायदेशीर धंद्यांचा उघडाड – प्रशासन झोपेत की मूकसंमतीत?

(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)

जंक्शन पोलीस स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर, रोडच्या पलीकडेच उघडपणे चालणाऱ्या बेकायदेशीर व्यवसायांनी नागरिकांच्या सहनशीलतेचा कडेलोट केला आहे. कायद्याची कास धरून बसलेल्या सर्वसामान्य जनतेसमोर प्रशासनाचे विकोपाला गेलेले मौन अनेक प्रश्न निर्माण करत आहे.

लॉजमध्ये राजरोस वेश्याव्यवसाय – पोलीस ठाण्यापासून काहीच अंतर नाही?

पोलीस स्टेशनपासून काहीच अंतरावर असलेल्या एका लॉजमध्ये मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती नागरिक उघडपणे देत आहेत? ये-जा करणाऱ्यांची गर्दी आणि सतत सुरू असलेली हलचाल यामुळे हा धंदा कोणाच्याच नजरेपासून लपून नाही, फक्त पोलिसांच्या नजरेतून मात्र अदृश्य? असल्याचे लोकांचे म्हणणे.

शेजारीच बेकायदेशीर चक्री व मटका – लोकांचे संसार उध्वस्त करणारा काळा उद्योग?

लॉजच्या शेजारीच बेकायदेशीर चक्री, मटका आणि जुगार क्लब जोरात सुरू आहेत. या धंद्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले तरी हे व्यवसाय मात्र थाटात आणि संरक्षणात चालू असल्याचे चित्र.

चार ते पाच मोठे मटका मालक, यांचा उघडपणे दबदबा असून त्यांचे जाळे सगळीकडे पसरलेले आहे.

गुटखाबंदी कागदावर – प्रत्यक्षात जय महाराष्ट्रात विक्री सुरूच?

राज्यात संपूर्ण गुटखा बंदी असताना जंक्शन परिसरात गुटखा, तंबाखू व इतर बंदी घातलेल्या वस्तूंची विक्री दिवसाढवळ्या सुरू.
हा गुटखा इथे कसा येतो? कोण संरक्षण देतो? नागरिकांच्या मनातील प्रश्न अधिक तीव्र होत आहेत.

जुगार क्लब – पैसेवाल्यांचे अड्डे खुलेआम?

रोडलगत सुरू असलेल्या जुगार क्लबमुळे कायद्याचा धाक पूर्णपणे संपला आहे. प्रशासनाचा हस्तक्षेप शून्य. वरवर बंदीचे आदेश पण प्रत्यक्ष पातळीवर कारवाईचा पुसटही मागमूस नाही.

“कुंपणच शेत खाते” – कॅबिनेट मंत्र्यांच्या गावाच्या शेजारीच ही राज्यव्यवस्था?

ज्या गावाजवळ कॅबिनेट मंत्री स्वतः राहतात, त्या हद्दीतच एवढे बेकायदेशीर धंदे गोरगरिबांच्या डोळ्यांत धुळ फेकत सुरू असतील तर ते महाराष्ट्राचा कारभार कोणत्या डोळ्यांनी पाहणार, असा जळता प्रश्न नागरिक विचारत आहेत.

का_कर कोण? हप्त्यांची वसुली कोणासाठी?

स्थानिक नागरिकांच्या तोंडी एकच नाव – “का_कर”
या व्यक्तीकडेच सर्व हप्ते जातात, तोच सगळा ‘मॅनेजमेंट’ बघतो, अशी चर्चा खुलेआम सुरू.
तो हप्ते कोणाकडे पोहोचवतो?
त्याच्या मागे कोणते राजकीय किंवा पोलीस छत्र आहे?
या प्रश्नांची उत्तरे कोणीच देत नाही.

बेकायदेशीर मुरमाच्या गाड्या – वाहतूक सुरूच, हप्तेखोर कोण?

रात्रीच्या वेळी धडाधड धावणाऱ्या बेकायदेशीर मुरमाच्या गाड्या जंक्शन परिसरातून जातात.
या वाहतुकीचा ‘व्हाया’ मार्ग पोलीस स्टेशनच्या डोळ्यांसमोरून असतानाही कारवाई शून्य?

लोकांचे म्हणणे –
“या सगळ्या गाड्यांचा हप्ता गोळा करणारा “बे_दर” कोण? त्या पैशांचा प्रवास कुठे होतो?”

नागरिकांचा संताप – उत्तर हवे, आणि ते तात्काळ हवे!

दररोजच्या बेकायदेशीर व्यवहारांनी त्रस्त नागरिकांनी प्रशासनाला सरळ प्रश्न विचारला आहे:

प्रशासन हे बंद करण्यासाठी बसले आहे की चालू ठेवून स्वतःची कोटींची भरभराट करण्यासाठी?

पोलीस स्टेशनच्या नाक्यापासूनच हे धंदे सुरू असतील तर पोलीस दृष्टीहीन झाले आहेत की इच्छाशक्तीहीन?

कॅबिनेट मंत्र्याच्या गावातच कायद्याचा असा ऱ्हास असेल तर महाराष्ट्रातील इतर भागाचे काय?

“नागरिकांना उत्तर मिळालेच पाहिजे” – जनतेची मागणी..!

जंक्शन परिसरातील भ्रष्टाचार, बेकायदेशीर धंदे आणि प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांनी राज्य स्तरावर ठोस चौकशी करण्याची मागणी केली आहे.
उत्तर हवे – स्पष्ट, थेट आणि तात्काळ, मिळणार का?


Translate »
error: Content is protected !!