काळ्या काचा काढल्या, पण फुटपाथ गिळंकृत करणाऱ्यांकडे कानाडोळा!
🔥MK NEWS 36 संपादकीय
वाहतूक विभागाचा दिखावा – सर्वसामान्यांवर धडाका, मोठ्यांवर मौन!
बारामती – वाहतूक विभाग एकीकडे सर्वसामान्य वाहनधारकांवर कारवाईचा धडाका सुरू ठेवत असताना, मूळ प्रश्न आजही जैसे थे आहेत. फलटण चौक, इंदापूर चौक, भिगवण रोड, बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी कायम आहे; मात्र वाहतूक कर्मचारी फक्त फेसबुकसाठी फोटोसेशन करण्यात आणि दिखाव्याच्या कारवाया करण्यात मग्न असल्याचं चित्र आहे.

फलटण चौकात काळ्या काचा काढल्या, हे योग्यच; पण त्याच ठिकाणी फुटपाथवर शोरूमधारकांनी टू-व्हीलर, फोर-व्हीलर उभे करून रस्ता जाम केला आहे. त्याकडे वाहतूक विभागाचं डोळंझाक सुरू आहे. इंदापूर चौकापासून भिगवण रोडपर्यंत मोठ्या व्यापाऱ्यांनी फुटपाथ गिळंकृत केलेत, त्याकडेही दुर्लक्षच!

कालपासून पाऊस पडत आहे आता फक्त पावसात उभे राहून फोटो काढायचे त्यांचे बाकी राहिला आहे का ते पण आज होते ते पाहण्याची गोष्ट आहे? मोबाईलमध्ये बिझी महिला वाहतूक कर्मचारी आणि फेसबुकवर पोस्ट टाकणारे अधिकारी – एवढ्यावरच वाहतूक नियंत्रण मर्यादित झालं आहे का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
मोठे ट्रान्सपोर्ट वाले – कुरु…, राय… नी , श्री_थ हिव…र लांबड्या गाड्या धडकावणारे क…णी पा डे, जेजु…रीचे ट्रान्सपोर्टर – यांच्यावर कारवाईचा धसका वाहतूक विभागाला आहे का? की काही अर्थकारणामुळे? का लॉबीच्या दडपणामुळे फक्त सर्वसामान्यांना त्रास देऊन शिस्तप्रिय असल्याचा दिखावा केला जातो?
बारामती बसस्थानक पुन्हा गोंधळाच्या मार्गावर आलं आहे. मोठ्या व्यापाऱ्यांवर व शोरूम वर कारवाई करता येईना म्हणून का? पुन्हा पुणे बारामती बारामती दौंड पॅसेंजर वाहतूक सुरू का? शाळकरी मुलांना वाहून नेणाऱ्या बस, स्कूल बस यांच्यावर कारवाईचा डांगोरा पिटला जातो, पण मोठ्या लॉबींवर कारवाईचं धाडस होत नाही.
नागरिकांचा सरळ सवाल – वाहतूक विभाग हा शिस्तप्रिय की फक्त दिखावाप्रिय?




