पुणे जिल्हा परिषद निवडणूक: दौंड तालुक्यात उत्साहात मतदान; सरासरी ६८.४८ टक्के नोंदणी…!
🔥MK NEWS36
पुणे जिल्हा परिषद निवडणूक : दौंड तालुक्यात उत्साहात मतदान; ६८.४८ टक्के सरासरी मतदानाची नोंद
यवत, दि. ८ :
पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी दौंड तालुक्यात मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत झालेल्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील १४ निर्वाचक गणांमध्ये सरासरी ६८.४८ टक्के मतदान झाले आहे.

सरस्वती तुकाराम दोरगे पाटील यांनी उंडवडी (तालुका दौंड) येथे वयाच्या 96व्या वर्षी केले मतदान..!
दौंड तालुक्यातील खामगाव निर्वाचक गण (८६) येथे सर्वाधिक ८०.०३ टक्के मतदानाची नोंद झाली असून, तालुक्यातील सर्वाधिक मतदान झालेले केंद्र म्हणून खामगाव पुढे आले आहे. त्याखालोखाल पारगाव (७३.२६ टक्के) आणि बोरीभडक (७२.५८ टक्के) येथे मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला.
मात्र, गोपाळवाडी निर्वाचक गण (९०) येथे केवळ ४९.९७ टक्के मतदान झाल्याने येथील मतदारांचा निरुत्साह चर्चेचा विषय ठरला आहे.
मतदानाची एकूण आकडेवारी पुढीलप्रमाणे :
दौंड तालुक्यातील एकूण २,७३,१०० मतदारांपैकी १,८७,००९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
यामध्ये —
पुरुष मतदार : ९९,९००
महिला मतदार : ८७,१०६
इतर : ३
निर्वाचक गणनिहाय मतदान टक्केवारी :
राहू (८५) – ७२.०३%
खामगाव (८६) – ८०.०३%
पारगाव (८७) – ७३.२६%
वरवंड (८८) – ७१.४६%
कानगाव (८९) – ६८.०८%
गोपाळवाडी (९०) – ४९.९७%
देऊळगाव राजे (९१) – ७०.४९%
खडकी (९२) – ६६.१२%
कुरकुंभ (९३) – ६९.५८%
पाटस (९४) – ५९.८९%
बोरीपार्धी (९५) – ७०.८६%
केडगाव स्टेशन (९६) – ७१.५४%
यवत (९७) – ६३.९२%
बोरीभडक (९८) – ७२.५८%

यवत येथे फारूक आत्तार यांनी कॅन्सर सारख्या गंभीर आजाराच्या वेदना असताना देखील मतदान केले..
महत्त्वाचे:
ग्रामीण भागात महिला मतदारांची संख्या लक्षणीय असून ८७,१०६ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रशासनाच्या माहितीनुसार, सर्व मतदान केंद्रांवर शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. आता उमेदवारांसह मतदारांचे लक्ष आगामी निकालांकडे लागले आहे.




