ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमनोरंजनराजकीयसामाजिक

लोणी काळभोरमध्ये एक कोटींचा बनावट गुटखा कारखाना उद्ध्वस्त; अंमली पदार्थ विरोधी पथकाची पहाटेची धडाकेबाज कारवाई…!


🔥MK NEWS36 

लोणी काळभोरमध्ये एक कोटींचा बनावट गुटखा कारखाना उध्वस्त
अंमली पदार्थ विरोधी पथकाची पहाटेची धडाकेबाज कारवाई..!

लोणी काळभोर, प्रतिनिधी :
अंमली पदार्थ विरोधी पथक क्रमांक २ आणि गुन्हे शाखेने पहाटेच्या सुमारास केलेल्या धाडीत तब्बल १ कोटी रुपयांचा बनावट आरएमडी गुटखा तयार करणारा कारखाना उध्वस्त करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कांबळे वस्ती, पाटील वस्ती परिसरात ही कारवाई पार पडली. गुटखा निर्मितीसाठी वापरला जाणारा कच्चा माल, केमिकल, प्रिंटेड पाऊच, सुगंधित तंबाखू, पानमसाला यासह मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

खात्रीलायक माहितीवरून छापा..
गुरुवार, ४ डिसेंबर रोजी पथकाला सुमित गुप्ता यांच्या मालकीच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट आरएमडी गुटखा तयार होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड यांच्या पथकाने पहाटेच गोडाऊनवर छापा टाकला.

यावेळी कारखान्यात रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता (२५), रामप्रसाद उर्फ बापू प्रजापती (५०), अप्पू सोनकर (४६) आणि दानिश खान (१८) हे प्रत्यक्ष गुटखा तयार करताना आढळले. सर्वांना ताब्यात घेण्यात आले असून गोडाऊन मालक सुमित गुप्ता फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

१ कोटींचा मुद्देमाल आणि तीन कार जप्त..
छाप्यात बनावट आरएमडी गुटखा, विमल गुटखा, सुगंधित तंबाखू, केमिकल, गुलाबपाणी, कच्चामाल, सुपारी, पाऊच, बॉक्स, पोती असा लाखो रुपयांचा साठा मिळून एकूण १ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच गुटखा वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन कार देखील जप्त केल्या, त्यात—

🚗इनोव्हा (MH 44 B 2023)

🚘इनोव्हा (MH 12 DM 0885)

🚖टाटा नेक्सॉन (MH 0T 8462)

या तिन्ही मिळून सुमारे ५० लाखांची वाहने आणि १ लाख ३० हजारांहून अधिक रोख रक्कमही हस्तगत करण्यात आली.

पथकाची कौशल्यपूर्ण कारवाई
ही धाडसी कारवाई निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय नितीनकुमार नाईक, पीएसआय अस्मिता लाड, तसेच प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, रविंद्र रोकडे, मयूर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, उदय राक्षे, सय्यद साहील शेख, संदीप शेळके, मच्छिंद्र धापसे, परेश सावंत, बबनराव केदार, दिशा खेवलकर, साधना पवार, नितीन जगदाळे, योगेश मांढरे, अझीम शेख, युवराज कांबळे, आझाद पाटील, प्रफुल्ल मोरे, शेखर खराडे यांच्या पथकाने अंजाम दिली.

सदर प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


Translate »
error: Content is protected !!