ई-पेपरताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

ड्रीम्स डिझायनर्स फाऊंडेशनने घडवला लोकाभिमुख आयोजनाचा आदर्श..!


🔥MK NEWS36 

ड्रीम्स डिझायनर्स फाऊंडेशन आयोजित मकर संक्रांती महाशॉपिंग व फूड फेस्टिवल 2026 ला विक्रमी प्रतिसाद..!
२२ नवनिर्वाचित नगरसेविकांचा सन्मान; बारामतीत आयोजनाचा नवा आदर्श..!
बारामती | प्रतिनिधी
ड्रीम्स डिझायनर्स फाऊंडेशनच्या वतीने मकर संक्रांतीच्या पर्वानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मकर संक्रांती महाशॉपिंग व फूड फेस्टिवल 2026 ने बारामतीच्या सामाजिक व व्यावसायिक जीवनात नवा विक्रम प्रस्थापित केला. दि. ९, १० व ११ जानेवारी २०२६ रोजी राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन, बारामती येथे पार पडलेल्या या तीन दिवसीय भव्य महोत्सवाला नागरिकांनी प्रचंड, उस्फूर्त व रेकॉर्डब्रेक प्रतिसाद दिला.
या प्रदर्शनाचे उद्घाटन बारामतीचे नगराध्यक्ष मा. सचिनजी सातव यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जोतिचंद भाईचंद सराफ अँड सन्स प्रा. लि. चे चेअरमन मा. शीतलजी शाह यांच्या शुभहस्ते पार पडले. उद्घाटनप्रसंगी बारामती शहरातील २२ नवनिर्वाचित नगरसेविकांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या विशेष सत्कार सोहळ्यामुळे कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक पातळीवर वेगळे महत्त्व प्राप्त झाले.

नगरसेविकांचा सत्कार व शॉपिंग स्टॉलचे काही क्षण..!

प्रदर्शनाच्या कालावधीत बारामतीतील अनेक नगरसेवक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, उद्योजक, व्यापारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेटी देत प्रदर्शनाची पाहणी केली. मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देत उत्पादनांची माहिती घेतली, स्टॉलधारकांचे मनोबल वाढवले आणि ड्रीम्स डिझायनर्स फाऊंडेशनच्या नियोजनबद्ध, शिस्तबद्ध व दूरदृष्टीपूर्ण आयोजनाचे मुक्तकंठाने कौतुक केले.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी स्टॉलधारकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ पैठणीचा’ या विशेष उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत कु. सृष्टी दिवेकर हिने प्रथम क्रमांक पटकावत आकर्षक पैठणीची मानकरी ठरली. ही पैठणी छाजेड गारमेंट्स यांच्या सौजन्याने प्रदान करण्यात आली.
तिसऱ्या दिवशी जोतिचंद भाईचंद ग्रुप अकॅडमी ऑफ डिझाईन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य फॅशन शोने उपस्थितांची विशेष दाद मिळवली. त्याचप्रमाणे प्रेक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जोतिचंद भाईचंद सराफ अँड सन्स प्रा. लि. यांनी मोलाची भूमिका बजावली. सहप्रायोजक म्हणून स्वराज फर्निचर, अमृता चहा, छाजेड गारमेंट्स, बालाजी सारीज, द हॅपी टेल्स फोटो स्टुडिओ, एस. एस. बुटीक, चंद्रकला अँटिक ज्वेलरी यांनी भरीव सहकार्य केले.
ॲडव्हर्टायझिंग पार्टनर म्हणून जावेद हबीब पार्लर अँड सलून व जोतिचंद भाईचंद ग्रुप अकॅडमी ऑफ डिझाईन, तर मिडिया पार्टनर म्हणून योद्धा प्रोडक्शन यांनी कार्यक्रमाचे व्यापक व प्रभावी वार्तांकन केले.
या प्रदर्शनात बारामतीसह कराड, सांगली, सातारा, पुणे, वाई आदी ठिकाणांहून आलेल्या उद्योजकांनी आकर्षक शॉपिंग स्टॉल्स, पारंपरिक व आधुनिक उत्पादने, संक्रांतीसाठी खास साहित्य तसेच चविष्ट व दर्जेदार फूड स्टॉल्स सादर केले. परिणामी नागरिकांनी मनसोक्त खरेदीसह खाऊगलीचा आनंद लुटला. तीन दिवसांत विक्रमी गर्दी व लक्षणीय आर्थिक उलाढाल झाल्याचे आयोजकांनी सांगितले.
उत्कृष्ट नियोजन, काटेकोर व्यवस्थापन, स्टॉलधारकांशी जपलेले मैत्रीपूर्ण संबंध व सातत्याने घेतलेली काळजी यामुळे स्टॉलधारकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. यशस्वी विक्रीमुळे स्टॉलधारकांनी या प्रदर्शनाला पाच-तारांकित रेटिंग देत आयोजकांबद्दल समाधान व्यक्त केले.
या यशस्वी उपक्रमाबद्दल ड्रीम्स डिझायनर्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. गीता पोटे, सचिव सौ. दर्शना जैन, सल्लागार श्री. अश्विनीकुमार पत्की तसेच संस्थेच्या संपूर्ण कोअर टीमच्या वतीने सर्व बारामतीकर, मान्यवर पाहुणे, मुख्य व सहप्रायोजक, ॲडव्हर्टायझिंग पार्टनर्स आणि मिडिया पार्टनर यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
या महोत्सवाच्या दणदणीत यशामुळे ड्रीम्स डिझायनर्स फाऊंडेशनने बारामतीत विश्वासार्ह, लोकाभिमुख व व्यावसायिक आयोजनाचा नवा मापदंड निर्माण केला असून, या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.


Translate »
error: Content is protected !!