ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

“वरिष्ठ यादी” फक्त नावापुरती – बंदोबस्त मिळतो फक्त समादेशकांच्या जवळच्यांना?


🔥MK NEWS 36 संपादकीय 

होमगार्ड विभागात पुन्हा नव्या अन्यायाचा फडशा!

“वरिष्ठांची यादी” हा फक्त मुखवटा – प्रत्यक्षात समादेशकाजवळच्या लोकांनाच बंदोबस्ताची सोय

बारामती – होमगार्ड विभागाचे नाव घेतले की पहिला प्रश्न पडतो: आज कोणता नवा भ्रष्टाचार उघड होतोय? आजचा ताजा किस्सा यालाच पुष्टी देतो.

धुळीराम दत्तात्रय लेंगोटे (रा. कांबळेश्वर), जे सध्या टीसी कॉलेजमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस शिपाई म्हणून कार्यरत आहेत, यांना ट्रॅफिक बंदोबस्तावर ड्यूटी लावली. लेंगोटे यांनी सरळ प्रश्न केला – “ही रात्रपाळी आहे का?”दिवसा  कॉलेज वरती शिपाई म्हणून काम करायला लागते त्यावर उत्तर मिळालं, हा ट्राफिक बंदोबस्त आहे, नाईट शिफ्ट नाही.

त्यांनी विनंती केली की त्यांच्या ऐवजी वैभव तावरे किंवा चंद्रकांत डोंगरे यांना लावा. पण समादेशक महाशय सरळ हात वर करून म्हणाले – मी बंदोबस्त लावत नाही, माझा संबंधच नाही!

मात्र आश्चर्य म्हणजे, गणपती व नगरपालिका बंदोबस्तावर हजेरी लावून आलेले  झगडे यांना तातडीने लेंगोटे यांच्या जागी ट्राफिक बंदोबस्तावर नेमलं गेलं. विचारले असता झगडे सरळ म्हणाले – समादेशक होमगार्ड साहेबांनीच मला सांगितलं.

मग मोठा प्रश्न असा – जर “वरिष्ठ यादी” खरंच पुण्यातूनच तयार होत असेल, तर मग काहींना लगेच बंदोबस्त मिळतो आणि बाकी 475 जवान मात्र रोज अन्याय भोगतात का?
यावरून एकच चित्र स्पष्ट होतं – संपूर्ण यादी, बंदोबस्त आणि ड्युट्या या बारामती कार्यालयाच्या चार भिंतीत बसून ठरवल्या जातात.

साध्या जवानांच्या तोंडूनही आता तोच सवाल –
👉 बंदोबस्त फक्त “समादेशकांचे जवळचे” असल्यामुळेच का मिळतात?
👉 आम्ही बाकीचे 475 जवान कोणत्या पापाची शिक्षा भोगतोय?

होमगार्ड विभागात सुरू असलेला हा “बंदोबस्त-भ्रष्टाचार” ही केवळ नालस्ती नसून, सरळ सरळ अन्यायाचा खेळ आहे.


Translate »
error: Content is protected !!