ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

नागरिकांच्या तक्रारींची दखल; बारामती वाहतूक पोलिसांची तत्पर कारवाई..!


🔥MK NEWS36 

बारामती शहरात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या नो-पार्किंगवर धडक कारवाई..!
बारामती| प्रतिनिधी
बारामती भिगवन रोड येथील नागरिकांकडून समाधानाची भावना
बारामती शहरातील सराफ होंडा शोरूम शेजारील रस्त्यावर अनधिकृतरीत्या उभ्या केलेल्या दुचाकी वाहनांमुळे वाहतुकीस एका बाजूने पूर्ण अडथळा निर्माण होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी बारामती वाहतूक शाखेकडे सातत्याने प्राप्त होत होत्या. या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन बारामती वाहतूक पोलिसांनी तात्काळ आणि ठोस पावले उचलत गुरुवार, दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी प्रभावी कारवाई राबवली.


या कारवाईदरम्यान नो-पार्किंग झोनमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी वाहनांवर कायदेशीर कारवाई करून संबंधित वाहनांवर केसेस दाखल करण्यात आल्या. तसेच रस्त्यावर अतिक्रमण करून लावण्यात आलेले लोखंडी बॅरिगेट हटवून संपूर्ण रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला. त्यामुळे दीर्घकाळापासून त्रस्त असलेल्या वाहनचालकांना व पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, वाहतूक पूर्ववत सुरळीत झाली आहे.
या तत्पर व नियोजनबद्ध कारवाईमुळे परिसरातील ये-जा करणाऱ्या नागरिकांनी बारामती वाहतूक पोलिसांचे मनापासून कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे. शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन नागरिकांच्या तक्रारींना गांभीर्याने घेत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप गिल (पुणे ग्रामीण), अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती) तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड (बारामती) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष अंमलबजावणी बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. निलेश माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
या मोहिमेत पोलिस हवालदार प्रदीप काळे तसेच पोलिस अंमलदार अजिंक्य कदम, आकाश कांबळे, महिला अंमलदार सुनीता ढेंबरे, माया निगडे आणि स्वाती काजळे यांनी अत्यंत शिस्तबद्ध व जबाबदारीने कामगिरी बजावली.
वाहतूक नियमांचे काटेकोर पालन आणि शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी बारामती वाहतूक पोलिसांनी उचललेले हे पाऊल निश्चितच प्रशंसनीय असून, भविष्यातही अशाच प्रकारच्या प्रभावी कारवायांमुळे शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित व सुव्यवस्थित होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. 🚓👏


Translate »
error: Content is protected !!