क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

होमगार्ड विभागात चाललंय तरी काय नेमकं जवानांचा सवाल..!


🔥 MK NEWS 36 संपादकीय

होमगार्ड विभागातील नवनवीन भ्रष्टाचाराच्या गोष्टी – जवानांचा सवाल : कायदा फक्त गोरगरिबांसाठीच का?

होमगार्ड विभागामध्ये दिवसेंदिवस नवनवीन भानगडी उघड होत असून, जवान मात्र गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. काही जवानांचे म्हणणे आहे की ऑनलाईन ट्रांजेक्शन झाले  तीन होमगार्ड ‘नॉट रिचेबल’ आहेत? परंतु हे ना घरी आढळतात, ना त्यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधता येतो? मग हे गेले कुठे? होमगार्ड जवानांना पडलेला प्रश्न आहे.

यामुळे जवानांचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे की, जर हे खरे असेल तर भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत? हा प्रकार केवळ खालच्या स्तरावरचा आहे का? यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील हात आहे का? हा खरा प्रश्न आता पुढे येतो आहे.

जवानांनी एवढ्या वेळा तक्रारी, अर्ज दिल्यानंतरही कसलाही निर्णय अथवा कारवाई होत नाही? हे लक्षात घेण्यासारखे आहे. यावरून जवान म्हणतात की, जर साधा होमगार्ड चुकला तर लगेच शिस्तभंगाची कारवाई केली जाते, मग भ्रष्टाचाराचे इतके स्पष्ट पुरावे असताना? संबंधितांवर कारवाई का होत नाही?

सामान्य नागरिकांमध्येही याबाबत चर्चा सुरू असून त्यांचा सवाल आहे की, कायदा-सुव्यवस्था ही केवळ गोरगरिबांसाठीच आहे का? भ्रष्टाचारी, मोठ्या पदावरील लोकांना मात्र कायद्याचे बंधन लागू होत नाही का?

या प्रकरणात शासन खरोखर ठोस कारवाई करून उदाहरण घालून देणार आहे का, की हा विषय फक्त चर्चेत राहून थंड बसणार? हे आगामी दिवसांत स्पष्ट होणार आहे?


Translate »
error: Content is protected !!