ई-पेपरताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

हिरालाल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी आधार कार्ड शिबिर..!


🔥MK NEWS36 

“राज्य राखीव पोलीस बल वर्धापन दिनानिमित्त दोन दिवसीय आधार कार्ड शिबिर”

दौंड : राज्य राखीव पोलीस बलाच्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, दौंड तालुका व शहर यांच्या वतीने दोन दिवसीय आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून विविध शासकीय योजनांची माहितीही नागरिकांना देण्यात आली.

शिबिराचे उद्घाटन राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ चे डीवायएसपी सचिन डहाळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दौंड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक विजय बोरकर, नगरसेवक निलेश पवार, नगरसेविका वैशालीताई माशाळकर, नगरसेविका ज्योतीताई राऊत, सामाजिक कार्यकर्ते विशाल माशाळकर, अजय राऊत, निलावती उद्योग व समूहाचे मालक सुरेश निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे दौंड तालुका अध्यक्ष तथा भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर संघटक हिरालाल साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर यशस्वीपणे पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौंड तालुका संपर्कप्रमुख सचिन जाधव यांनी केले.

या शिबिरात नागरिकांना आधार कार्ड नोंदणी, दुरुस्ती व नूतनीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरादरम्यान पाच वर्षांखालील ३७ लहान मुलांची नवीन आधार नोंदणी, ९१ नागरिकांचे आधार कार्ड नूतनीकरण व दुरुस्ती, ७ सुकन्या समृद्धी योजनेची नोंदणी तसेच १८ जणांची अपघाती विमा पॉलिसी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दौंड तालुका उपाध्यक्ष धनराज गायकवाड, तालुका सचिव कृष्णा शिवशरण, तालुका खजिनदार विजय मोरे, दौंड शहर अध्यक्ष अमोल आवारे, उपाध्यक्ष दिनेश वाल्मिकी, सल्लागार सुनील काळे, आबा पवार, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ७ चे सामाजिक कार्यकर्ते गणेश भोसले तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सभासदांनी सहकार्य केले.

यावेळी ॲडव्होकेट अनिकेत मिसाळ व ॲडव्होकेट गणेश कांबळे यांनी उपस्थित नागरिकांना कायदा व सुव्यवस्था याबाबत सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे नागरिकांना आधार कार्ड व विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांचे आयोजन पुढेही करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.


Translate »
error: Content is protected !!