ई-पेपरताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

बारामतीतील राहुल भापकर यांची बँक कर्मचारी संघाच्या संघटक सचिवपदी नियुक्ती..!


🔥MK NEWS36

बारामती : बँक कर्मचारी संघात राहुल भापकर यांची संघटक सचिवपदी नियुक्ती

बारामती (प्रतिनिधी) – बारामती सहकारी बँक मर्यादित येथील राहुल शांताराम भापकर यांची बँक कर्मचारी संघ, पुणे या संघटनेच्या संघटक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती संघाचे प्रमुख सल्लागार माननीय श्री दीपक भाऊ मानकर यांच्या मान्यतेने करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.

संघटनेच्या मानसेवी सदस्यांमधून निवड करत भापकर यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सन 2025 ते 2027 या कालावधीसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, पुणे जिल्ह्यातील सर्व सहकारी बँकांमधील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रश्न सोडविणे, त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठविणे तसेच संघटनेची प्रगती आणि बळकटी वाढविणे, ही प्रमुख उद्दिष्टे त्यांच्या कार्यकाळात अपेक्षित आहेत.

राहुल भापकर यांनी यापूर्वीही बँकिंग क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या असून, संघटनात्मक कार्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. त्यांच्या निवडीमुळे संघटनेच्या कामकाजाला नवी गती मिळेल, असा विश्वास संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, भापकर यांनीही आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत पुणे जिल्ह्यातील सहकारी बँक कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि संघटनेच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.


Translate »
error: Content is protected !!