ताज्या घडामोडीमनोरंजनसामाजिक

मराठी-हिंदी मालिकेतून घराघरात पोचलेला चेहरा काळाच्या पडद्याआड


🔥MK NEWS 36

📰 दुःखद बातमी

प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे यांचे कर्करोगाशी झुंज देत असताना काल रात्री दुःखद निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रिया गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी सामना करत होत्या. उपचार सुरू असतानाही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रिया मराठे यांनी मराठी तसेच हिंदी मालिकांमधून अभिनयक्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवली होती. त्यांची साधी, मनमोकळी व गोड भूमिका प्रेक्षकांच्या मनावर घर करून गेली होती. त्यांच्या निधनाने मराठी रंगभूमी, मालिकाविश्व आणि चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व असंख्य चाहते असा मोठा परिवार आहे.
अंत्यसंस्कार आज सायंकाळी मुंबईत करण्यात येणार आहेत.

🌹 भावपूर्ण श्रद्धांजली 🌹


Translate »
error: Content is protected !!