“सेवा केली देशाची, भरली किंमत भ्रष्टाचाराची – होमगार्डची कहाणी दारिद्र्याची!”
🔥MK NEWS 36 संपादकीय
होमगार्ड विभागात भ्रष्टाचाराचा महास्फोट?
होमगार्ड विभागात नेमकं चाललय तरी काय? हा प्रश्न आज प्रत्येक जवान आणि नागरिक विचारतोय. ड्युटीच्या नावाखाली हजारो रुपये उकळले जात आहेत, ड्रेस किटचे अनुदान डांबरून टाकले जातेय, ड्युटी हवी असेल तर “हप्ता भरा” हे सरळ नियम केल्यासारखं वागवलं जातंय का?ही बाब फक्त बारामतीपुरती मर्यादित नाही, तर भंडारा जिल्ह्यातसुद्धा हाच भ्रष्टाचार थाटामाटात सुरू असल्याचे पुरावे? होमगार्ड जवानांनी स्वतः पुढे येऊन दिले आहेत.
जवानांचा थेट आरोप असा आहे की, “२००, ४००, ५०० रुपये हप्ता घेऊन अधिकारी खोटे राजे झालेत, आणि खऱ्या अर्थाने देशसेवेसाठी उभे राहिलेले जवान उपासमारीच्या स्थितीत आहेत.” याहून लाजिरवाणं चित्र काय असेल? ज्यांना आवाज उठवायचा धाडस होतंय त्यांनाच निलंबित करून दाबलं जातंय. हा अन्याय नाही तर सरळ सरळ गुलामी लादण्याचा प्रयत्न आहे, असा संतप्त सवाल जवान आणि त्यांचे कुटुंबीय करत आहेत.

भ्रष्टाचाराचे धागेदोरे जिल्ह्यापासून थेट मुंबई विभागापर्यंत पोहोचले आहेत का? वरिष्ठ अधिकारी यामध्ये थेट सामील आहेत का? कारण कोणत्याही प्रकारची चौकशी, अंतर्गत कारवाई, चौकशी समिती, साद बोलावणे—काहीच होत नाही. मग याचा सरळ अर्थ काय? “वरपासून खालपर्यंत गाठलेलं भ्रष्ट जाळं” असा होमगार्ड जवानांचा जळजळीत आरोप आहे?
एका बाजूला अधिकारी जवानांवर हप्ते गोळा करणे, पोलिस असल्याची बतावणी करणे, बनावट प्रकरणं लावणे असे आरोप टाकून त्यांचा आवाज गप्प करण्याचा प्रयत्न? करतात, तर दुसऱ्या बाजूला खराखुरा भ्रष्टाचार पुराव्यांसह सोशल मीडियातून, व्हाट्सअपमधून, अर्जांमधून बाहेर येतोय. हे पुरावे भंडाऱ्यातून थेट बारामती, बारामतीतून पुणे आणि पुण्यातून मुंबईपर्यंत पोहोचले आहेत.
यातील सर्वात भीषण बाब म्हणजे—
👉 गरीब होमगार्ड जवान जो मोलमजुरी करून पोट भरतो, त्याला हप्ता न भरल्यामुळे ड्युटी मिळत नाही.
👉 जो भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवतो, त्याला निलंबित करून तोंड दाबलं जातं.
👉 आणि जे वरिष्ठ खुर्चीत बसलेले अधिकारी, ते या सर्वाला मूक संमती देत भ्रष्टाचाराच्या खेळात सामील असल्याची संशयास्पद स्थिती आहे.
आज सवाल असा आहे—
हा विभाग “होमगार्ड” आहे की “हप्तागार्ड”?
जवानांच्या कष्टाने चालणारा हा विभाग आता पैशांच्या हप्त्यांनी चालतोय का?
आणि जेव्हा एमके न्यूजसारख्या माध्यमांनी वारंवार पोल खोल केली, तेव्हा भंडाऱ्यासारख्या जिल्ह्यातूनसुद्धा पुरावे पुढे आलेत.
👉 मग सरकार आणि विभागीय वरिष्ठ अधिकारी यावर तत्काळ चौकशी करून कारवाई करतील का?
👉 की पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचं झाकपाक करून सामान्य जवानांनाच बळी ठरवलं जाईल?
आज हा प्रश्न फक्त होमगार्ड जवानांचा नाही, तर त्यांच्या घरातील प्रत्येक कुटुंबाचा आहे.
होमगार्ड विभागातले हप्ते आणि भ्रष्टाचाराचे साम्राज्य फोडून टाकण्याची वेळ आता आली आहे!




