“होमगार्डमध्ये भ्रष्टाचाराची हुकूमशाही – आवाज उठवणाऱ्यांचे निलंबन”
🔥MK NEWS 36 संपादकीय
🚨 होमगार्ड विभागात काय चाललंय?
आवाज उठवणाऱ्यांना निलंबन – भ्रष्टाचार्यांचा बचाव?
होमगार्ड विभागात सुरू असलेल्या घडामोडी आता जनतेला हादरवून सोडणाऱ्या आहेत. ज्येष्ठ अधिकारी किंवा जवान जर अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात, तर त्यांच्यावर “निलंबनाची कारवाई” करून गप्प बसवले जात आहे का, असा गंभीर सवाल उभा राहिला आहे.
माहिती अधिकारातून समोर आलेले धक्कादायक मुद्दे
संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप — पोलीस कर्मचारी असल्याची बतावणी करून वाळू-मुरूम उत्खनन करणाऱ्यांकडून हप्ते वसूल करणे.
अधिकाऱ्यांच्या नावावर पैशांची उकळी; पण त्याचे ठोस पुरावे आहेत का? मात्र माहिती अधिकारात फक्त अहवाल दिला जातो असे का?
जर हा व्यवसाय (वाळू-मुरूम) सुरू असेल, तर मग पोलीस नेमके काय करत आहेत?
आणि जर तो बंद असेल, तर मग गोळा केलेले पैसे कुणाचे? आणि कुठे गेले?
आवाज उठवणाऱ्या होमगार्ड अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक फसवून निलंबित केले जात का?

जवानांचा सवाल
होमगार्ड जवान थेट प्रश्न विचारतात –
👉 आवाज उठवणाऱ्यांना निलंबन देणे म्हणजे भ्रष्टाचार झाकण्याचा प्रयत्न नाही का?
👉 “भ्रष्टाचाराचा जनक” या खेळामध्ये हस्तक्षेप करून सर्व गोष्टी स्वतःच्या फायद्यासाठी रचत नाही का?
👉 जर पुरावेच आहे की नाहीत, तर मग हा आरोप नेमका काय दर्शवतो – सत्य दडपण्याचा प्रयत्न की धमकावणे?
धक्कादायक वास्तव
हे सगळं सुरू असताना –
होमगार्ड जवानांना न्याय मिळणार आहे की नाही?
भ्रष्ट अधिकारी मात्र निर्भयपणे पैशांची उकळपट्टी करतात का?
लोकांची फसवणूक होते आणि जनतेचा विश्वास ढासळतो.
🔴 निष्कर्ष
होमगार्ड विभागात सुरू असलेला हा प्रकार हा गंभीर भ्रष्टाचाराचा खेळ असून आवाज उठवणाऱ्यांना दडपण्यासाठी निलंबनासारखी शस्त्रे वापरली जात आहेत. हा प्रकार “आवाज दाबा, भ्रष्टाचार झाका” अशा भूमिकेकडे निर्देश करतो.




