ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

बारामतीत गावठी पिस्तूलासह फिरणारा तरुण जेरबंद — पोलिसांच्या धाडसी कारवाईने मोठा गुन्हा टळला..!


🔥MK NEWS36 

बारामतीत गावठी पिस्तूलासह दहशत माजवणारा संशयित अटक
पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळला..!

बारामती | प्रतिनिधी
बारामती शहरात नगरपालिका निवडणूक 2025 च्या आचारसंहितेदरम्यान बेकायदेशीर शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला बारामती शहर पोलिसांनी अतिशय वेगवान आणि नेमकी कारवाई करत जेरबंद केले. वेळेवर मिळालेली गुप्त माहिती आणि तातडीने उचललेले पावले यामुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटना 28 नोव्हेंबर रोजी अमराई परिसरात घडली. गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत यांच्या पथकाला जनहित प्रतिष्ठान शाळेजवळ एक व्यक्ती गावठी पिस्तूलासह फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने ही माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांना दिली. आदेश मिळताच पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.

पंचासमक्ष करण्यात आलेल्या अंगझडतीत पोलिसांना एक गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतूस आणि मॅगझिन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले. अटक करण्यात आलेल्या संशयिताची ओळख प्रदीप सुरेश नकाते (वय 27, रा. ऋतुसृष्टी अपार्टमेंट, प्रगतीनगर, बारामती) अशी पटली.

या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये आर्म अॅक्ट 1959 कलम 3(25), भारतीय न्याय संहिता कलम 3(5) आणि मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी सुनावली असून चौकशीत आरोपीने शस्त्र कोठून मिळवले याबाबतची माहिती पोलिसांकडे दिल्याचे सूत्रांनी सांगितले. शस्त्र पुरवठादाराचा शोध सुरू असून त्याला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.

या शस्त्राचा नेमका कोणत्या हेतूसाठी वापर होणार होता, तसेच निवडणूक काळातील संवेदनशील परिस्थितीत आरोपीचे उद्दिष्ट काय होते याबाबत सखोल तपास सुरू आहे. या तपासाचे मार्गदर्शन मा. पोलीस अधीक्षक गिल साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड यांच्यासह प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी करत आहेत.

दरम्यान, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देत प्रभारी पोलीस निरीक्षक चिवडशेट्टी म्हणाले,
“शहरात कुणीही बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.”


Translate »
error: Content is protected !!