ई-पेपरक्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

वरवंडची अल्पवयीन मुलगी मृत — आत्महत्या की रहस्यमय हत्या? चौकशीतील धीम्या गतीवर नागरिकांचा संताप!


🔥MK NEWS36 

वरवंडमधील अल्पवयीन मुलीच्या मृत्यूमागील रहस्य कायम — आत्महत्या की काहीतरी वेगळं?; MK NEWS36 न्यूजकडून सखोल चौकशीची मागणी..!

(प्रदिप गायकवाड मुख्य संपादक MK NEWS36)

वरवंड | दौंड
गेल्या महिन्यात घडलेला अल्पवयीन मुलीचा मृत्यूचा प्रकार अजूनही रहस्यमय अवस्थेतच अडकलेला आहे. अधिकृत नोंदीनुसार हा मृत्यू आत्महत्या म्हणून दाखल झाला असला, तरी प्रकरणाभोवती अनेक प्रश्नचिन्हे निर्माण होत आहेत. विशेषतः, मृत्यूपूर्वी आदल्या दिवशी एका तरुणासोबत झालेल्या वादानंतर दुसऱ्याच दिवशी मुलीने जीव दिल्याने नागरिकांमध्ये संताप उसळला आहे.

कारवाईचा अभाव— नागरिकांमध्ये वाढता रोष..!

स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की या प्रकरणात संबंधित तरुणाची अद्याप चौकशीसाठीही मागणी केलेली नाही. मुलीचा मोबाईल, लोकेशन, संभाषण, कॉल रेकॉर्ड्स यांच्याद्वारे मिळालेल्या प्राथमिक संकेतांनुसार दोघांमध्ये काही तणाव निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

परंतु नेमकं यामागे काय घडलं, याबाबतचे प्रश्‍न आजही अनुत्तरीत आहेत. लोकांचा असा सवाल आहे की अद्याप FIR का नाही? आणि चौकशीची गती मंदावलेली का दिसते?

राजकीय आणि आर्थिक दबावाच्या चर्चा?

नागरिकांमध्ये चर्चा आहे की आरोपी म्हणून संशयित असलेला मुलगा पुण्यात सलून प्रशिक्षण घेत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे “चौकशीपर्यंत तरी त्याला रोखले गेले पाहिजे होते का?” हा प्रश्न पुन्हा जोर धरत आहे.
काहींचा दावा आहे की प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे का? राजकीय की आर्थिक दबाव आहे का? प्रशासकीय स्तरावर विलंब का दिसतोय?

याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी नसली, तरी लोकांमधील संताप दिवसेंदिवस वाढत आहे.

दलित कुटुंबावर दु:खाचा डोंगर — न्याय मिळणार का?

मृत मुलीचे कुटुंब हे दलित समाजातील असून, त्यांचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
कुटुंब न्यायासाठी धडपडत आहे, परंतु आजपर्यंत त्यांना ठोस उत्तर मिळालेले नाही.

MK NEWS 36 न्यूजकडून सखोल चौकशीची मागणी..!

MK NEWS 36 न्यूज या प्रकरणातील सर्व बाजूंचा सखोल अभ्यास करत असून, पुढील काही दिवसांत संपूर्ण घटनाक्रम, संभाव्य कारणे, चौकशीतील उणिवा, आणि नागरिकांच्या भावना यासंदर्भात विस्तृत तपास पत्रकारितेच्या माध्यमातून समोर आणणार आहे.

नागरिकांचीही मागणी आहे की—

संबंधित व्यक्तींची तत्काळ चौकशी

मोबाईल डेटा, लोकेशन, सीसीटीव्ही, हॉटेल फुटेज यांची वैज्ञानिक तपासणी

कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा आर्थिक दबाव दूर ठेवून निष्पक्ष तपास

“ही मुलीची अखेर नाही; न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील” असा स्वर सध्या संपूर्ण परिसरात उमटताना दिसत आहे.


Translate »
error: Content is protected !!