दौंड पोलीस स्टेशन गणपतीचे ढोलताशांच्या गजरात विसर्जन..!
🔥MK NEWS 36
दौंड पोलीस स्टेशन गणपती बाप्पांचे गाजावाजात विसर्जन
कोमल सोनवणे
दौंड प्रतिनिधी | 2 सप्टेंबर 2025
दौंड शहरातील पोलीस स्टेशनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही गणरायाची प्रचिती बसविण्यात आली होती. सहा दिवसांच्या उत्सवानंतर आज, दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी, पारंपरिक जल्लोषात व ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे विसर्जन करण्यात आले.

याआधी 1 सप्टेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिमय वातावरणात पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन गणपती बाप्पाची मिरवणूक काढली. पारंपारिक पद्धतीने गजर, नाच-गाणी आणि उत्साहाच्या वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला.

“गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” अशा गजरात गणेश विसर्जन सोहळा संपन्न झाला. गणरायाने सर्वांना सुबुद्धी द्यावी, अशी प्रार्थना सहकारी पोलीस बांधवांनी चरणी अर्पण केली.




