ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

ओम मार्शल आर्ट अँड सोशल सर्विस असोसिएशनतर्फे व्यवसाय मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले


🔥MK NEWS 36 

📰 ओम मार्शल आर्ट अँड सोशल सर्विस असोसिएशन तर्फे व्यवसाय मार्गदर्शन शिबिर यशस्वी

दौंड (प्रतिनिधी) :
पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व ओम मार्शल आर्ट अँड सोशल सर्विस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवसाय मार्गदर्शन शिबिर दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी रनर्स करिअर अकॅडमी, सरपंच वस्ती, दौंड येथे उत्साहात पार पडले.

या शिबिराला परिसरातील तरुणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून करियर व व्यवसायाविषयी मार्गदर्शन घेतले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सदाशिव रणदिवे (कॅम् कॉम्प्युटर संचालक) उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. उमेश नडगमकर (करियर मार्गदर्शक) व नितीन चव्हाण (क्रीडा मार्गदर्शक) यांनी उपस्थित राहून युवकांना करियर, व्यवसायाच्या संधी तसेच भावी आयुष्यातील स्पर्धा परीक्षा याविषयी सविस्तर माहिती दिली.

शिबिरादरम्यान युवकांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. योग्य दिशा, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर करियरमध्ये नक्कीच यश मिळवता येते, असा विश्वास मार्गदर्शकांनी व्यक्त केला.

ओम मार्शल आर्ट अँड सोशल सर्विस असोसिएशनच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. शिबिर यशस्वी पार पडल्याने युवकांत उत्साहाचे वातावरण होते.


Translate »
error: Content is protected !!