क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

“भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांचे खच्चीकरण – होमगार्ड विभागाचा काळा चेहरा उघड होतोय का?”


🔥MK NEWS 36 संपादकीय 

 होमगार्ड विभागातील भ्रष्टाचार – आवाज उठवणाऱ्यांचे खच्चीकरण सुरूच!

होमगार्ड विभागात भ्रष्टाचाराचे जाळ इतके घट्ट विणले गेले आहे की, त्यात आवाज उठवणाऱ्याला अक्षरशः दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. याचे ठळक उदाहरण नुकतेच समोर आले आहे.

माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या धक्कादायक माहितीप्रमाणे, एका होमगार्ड अधिकाऱ्यावर आरोप लावून त्यांचे निलंबन व बदनामी करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे का?

ते ड्युटीवर होमगार्ड अधिकारी असताना अधिकाऱ्याचा ड्रेस न घालता होमगार्डचा ड्रेस परिधान करायला लावणे त्यांच्याकडे आदेश असताना सुद्धा मुद्दामून होमगार्ड जवानाचा ड्रेस परिधान करायला सांगणे?

अवैध व्यवसायाचे हप्ते गोळा करत होते का?

व कामावर नियमित नव्हते.

👉 पण प्रश्न असा की जर ते खरोखर हप्ते गोळा करत असतील, तर ते कोणाचे गोळा करत होते? आणि जर हे आरोप  खोटे असतील तर मग हे फक्त त्यांना गप्प करण्याचे साधन होते का?
यामागे प्रशासकीय कर्मचारी व होमगार्ड विभाग यांनी मिळून यांना दबावण्याचा  प्रयत्न झाला आहे का?

हा प्रकार मार्च महिन्यात घडलेला असून, याबाबतची खरी माहिती नागरिकांना आता मिळतेय. इतकेच नव्हे तर माहिती मागणाऱ्यांनाही उडवा-उडवीची उत्तरे दिली गेल्याने संशय अधिकच गडद होत आहे?

💥 नागरिकांमध्ये आता मोठा प्रश्न उपस्थित होत आहे –

“भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांचेच खच्चीकरण होत असेल, तर त्याला जबाबदार कोण?”

“होमगार्ड प्रमुखांनीच मुद्दाम हा प्रकार घडवून आणला आहे का?”

“न्याय मागणाऱ्यालाच शिक्षा मिळणार असेल तर मग भ्रष्टाचार संपणार कसा?”

होमगार्ड किटचे अनुदान आलेले असूनही ते मिळत नाही याबद्दल प्रश्न विचारला म्हणून?

परेडला न येणाऱ्या, गैरहजर पण तरीही नियमित मानल्या जाणाऱ्या लोकांविरुद्ध आवाज उठवला म्हणून?

ज्यांना ड्युटी मिळत नाही त्यांच्यावरील अन्याय थांबवून त्यांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले म्हणून?

म्हणजेच, खऱ्या अर्थाने न्यायासाठी केलेला संघर्षच त्यांचा “गुन्हा” ठरला आहे का?

आणि या “गुन्ह्याची” शिक्षा काय मिळाली? तर त्यांना थेट निलंबित करून, आरोप लावून बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे का?

💥 ही बाब अत्यंत गंभीर असून, नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे का?

“भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्यालाच जर गप्प बसवले जाणार असेल तर मग प्रामाणिकपणा हा गुन्हा ठरणार का?”

“ड्युटीवर न येणारे सुरक्षित आणि आवाज उठवणारा धोक्यात – हीच का व्यवस्था?”

“न्याय मागणाऱ्याला शिक्षा, भ्रष्टाचार करणाऱ्याला संरक्षण – हा होमगार्ड विभाग की ‘भ्रष्टाचार विभाग’?”

यामुळे होमगार्ड विभागाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रशासनाने यावर त्वरीत कारवाई न केल्यास नागरिकांचा विश्वास पूर्णपणे ढासळणार हे निश्चित.


Translate »
error: Content is protected !!