चौफुला : न्यू अंबिका कला केंद्रावर हवेत गोळीबार; चार जणांविरोधात गुन्हा दाखल, आरोपी फरार…
MK NEWS 36/प्रतिनिधी
चौफुल्यावर हवेत अंदाधुंद फायरिंग. …
चौफुला : न्यू अंबिका कला केंद्रावर हवेत गोळीबार; चार जणांविरोधात गुन्हा दाखल, आरोपी फरार
चौफुला परिसरातील न्यू अंबिका कला केंद्र येथे 21 जुलै रोजी रात्री साडेदहा ते अकरा दरम्यान हवेत गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी कला केंद्राचे मॅनेजर बाबा अंधारे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फायरिंग करणाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे :
1. बाबासाहेब मांडेकर
2. गणपत जगताप
3. चंद्रकांत मारणे
4. तसेच त्यांच्यासोबत असलेला एक अज्ञात इसम..
सदर घटनेतील सर्व चौघे आरोपी सध्या फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. हवेत केलेल्या गोळीबाराचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, या घटनेमुळे न्यू अंबिका कला केंद्र परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
स्थानिक पोलीस अधिक तपास करत असून, आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे…




